सध्या स्मार्टवॉच घालणे म्हणजे एक फॅशन आहे. खासकरून हे स्मार्टवॉच फिटनेसची काळजी घेणाऱ्या लोकांसाठी बनले आहे; ज्यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही सकाळी चालायला गेल्यावर यात तुमच्या स्टेप्स मोजण्यापासून हृदयाचे ठोके ओळखण्यापर्यंत यात अनेक उपयोगी गोष्टी आहेत. आज यूकेमधील याबाबतची एक घटना समोर आली आहे. स्मार्टवॉचने एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. खासगी कंपनी हॉकी वेल्सचे सीईओ यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यादरम्यान त्यांच्या स्मार्टवॉचने त्यांना मदत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खासगी कंपनी हॉकी वेल्सचे सीईओ पॉल वॅपमॅफ ४२ वर्षांचे आहेत. यूकेच्या परिसरात ते सकाळी चालण्यासाठी (Morning Walk) बाहेर निघाले. चालताना त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्यांनी मदतीसाठी आजूबाजूला कोणी आहे का हे पाहिले. त्यांना यादरम्यान असह्य वेदना होत होत्या. मग ते गुडघ्यावर टेकून काही वेळ बसून राहिले. त्यानंतर त्यांना आठवले की, त्यांनी स्मार्टवॉच घातले आहे. या स्मार्टवॉचच्या मदतीने त्यांनी आपल्या पत्नीला फोन करून, त्यांची परिस्थिती सांगितली.

आपत्कालीन परिस्थितीत हे स्मार्टवॉच त्यांच्या मदतीला धावून आले. खासगी कंपनी हॉकी वेल्सचे सीईओ यांना सकाळी चालायला जाताना छातीत असंख्य वेदना होऊ लागल्या म्हणून त्यांनी आपल्या स्मार्टवॉचची मदत घेतली आणि पत्नी लॉरा यांना त्यांनी फोन केला. सुदैवाने त्यांचे घर जवळ असल्यामुळे त्यांची पत्नी वेळेत पोहोचली आणि वैद्यकीय उपचारासाठी त्यांना दवाखान्यात घेऊन गेली, असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत स्मार्टवॉचने मदत केल्याचे उदाहरण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा… युजर्सना मोठा धक्का! प्रसिद्ध चॅटिंग प्लॅटफॉर्म अचानक बंद; कारण आलं समोर

तंत्रज्ञानामुळे माणसांचे आयुष्य झाले सोपे :

स्मार्टवॉचमध्ये एक सेन्सर बसवलेला असतो; जो तुमच्या मनगटातील नसांतून तुमच्या हृदयाचे ठोके ओळखतो. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग मर्यादित असतो. हा वेग कमी किंवा जास्त असल्यास स्मार्टवॉचचा सेन्सर तुम्हाला माहिती देतो. सीईओ सकाळी ७ च्या सुमारास घराबाहेर पडले आणि पाच मिनिटांनी त्यांना लगेच छातीत वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यांनी स्मार्टवॉचची मदत घेत, आपल्या पत्नीला फोन लावून त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि मग ते दोघे दवाखान्यात गेले. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी हा खरोखरच एक धक्का होता, असे सीईओ म्हणाले आहेत.