Google Pixel 6a स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. गुगलने दोन वर्षांपूर्वी पिक्सेल स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. कंपनीने हा फोन Google IO 2022 मध्ये सादर केला आहे. आत्तापर्यंत हा स्मार्टफोन फक्त काही देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. या गुगल फोनची प्री-बुकिंग आता भारतातही सुरू झाली आहे. Google Pixel 6a हा गेल्या वर्षी लाँच झालेल्या कंपनीच्या Pixel 5a चा सक्सेसर आहे जो भारतात लाँच झाला नव्हता. यापूर्वी, कंपनीने २०२० मध्ये भारतात Pixel 4a सादर केला होता. फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा इनहाउस टेन्सर प्रोसेसरसह सादर केला गेला आहे. भारतात या Google फोनची थेट स्पर्धा OnePlus 10R, Nothing Phone (1), आणि Realme GT मालिकेशी होत आहे.

Google Pixel 6a ची किंमत किती आहे?

Google Pixel 6a स्मार्टफोन भारतात ६जीबी रॅम आणि १२८जीबी अंतर्गत स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. भारतात या फोनची किंमत ४३,९९९ रुपये आहे, जी चारकोल (ब्लॅक) आणि चॉक (व्हाइट) कलर पर्यायांमध्ये येते. या फोनचा सेज (ग्रीन) कलर ऑप्शन भारतात लाँच झालेला नाही. भारतात २८ जुलैपासून फोनची विक्री सुरू होईल पण फ्लिपकार्टवर फोनची प्री-बुकिंग सुरू झाली आहे.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Raj Thackeray Election
Raj Thackeray : राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत? बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाले…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन

(हे ही वाचा: लवकरच लाँच होणार iPhone 14; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही)

Google Pixel 6a: लाँच ऑफर्स

  • Axis Bank कार्ड आणि EMI व्यवहारांवर ४०० झटपट सवलत (मर्यादित वेळेची ऑफर)
  • जुन्या पिक्सेल फोनवर ६००० रुपये एक्सचेंज
  • जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण करण्यावर एडिशन २००० ची सूट
  • Pixel 6a वर Google Nest Hub Gen2/Pixel Buds A Series/ Fitbit Inspire २ फक्त ४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करा
  • YouTube Premium आणि Google One तीन महिन्यांचे सदस्यत्व
  • Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर ५% कॅशबॅक
  • निवडलेल्या कार्डांवर नो कॉस्ट ईएमआय ऑफर
  • Google Pixel 6a: तपशील आणि वैशिष्ट्ये

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा फुल HD + OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४०० पिक्सेल, २०:९ आस्पेक्ट रेशो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ संरक्षण देण्यात आले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश दर ६०Hz आहे. Pixel 6a स्मार्टफोनमध्ये गुगलचा टेन्सर प्रोसेसर देण्यात आला आहे, जो Pixel ६ आणि ६ Pro मध्ये आढळतो. यासोबतच फोनमध्ये Titan M2 सिक्युरिटी को-प्रोसेसर आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या फोनचा प्राथमिक कॅमेरा १२.२MP आहे, ज्याचा अपर्चर /१.७ आहे आणि दुय्यम कॅमेरा १२MP / २.२ आहे. हा गुगल फोन OIS आणि EIS ला सपोर्ट करतो. फोनमध्ये ८MP सेल्फी कॅमेरा आहे.

पाहा व्हिडीओ –

( हे ही वाचा: 5000mAh बॅटरीसह Oppo चा स्वस्तात मस्त फोन खरेदी करा; मिळेल मोठी सूट)

गुगलचा हा फोन ४K ६०fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये ४,४१०mAh बॅटरी आणि १८W फास्ट चार्जिंग आहे. तुम्हाला या फोनसोबत चार्जर मिळत नाही. हा Google Pixel स्मार्टफोन Android १२ वर चालतो. या फोनला तीन प्रमुख अँड्रॉइड अपडेट्स आणि ५ सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. फोन USB Type-C ३.१ Gen १, Stereo Speakers, Wi-Fi 6 (802.11ax), MIMO सह 6E, ब्लूटूथ v5.2, NFC सारख्या कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांसह ऑफर करण्यात आला आहे. फोनची जाडी ८.९एमएम आणि वजन १७८ ग्रॅम आहे.