वनप्लस कंपनीचा आगामी फोन वनप्लस १२ काही दिवसांपासून मार्केटमध्ये चर्चेत आहे. कंपनी उद्या म्हणजेच ५ डिसेंबरला हा फोन लाँच करणार आहे. मात्र, सर्वप्रथम हा फोन होम मार्केटमध्ये म्हणजेच चीनमध्ये लाँच केला जात आहे. त्यानंतरच वनप्लस १२ जागतिक आणि भारतीय बाजारात आणला जाईल. कंपनीने आधीच या फोनमधील काही हटके फीचर्सचा खुलासा केला आहे. तसेच या सर्व फीचर्सनुसार वनप्लस ११ पेक्षा वनप्लस १२ची किंमत जास्त असू शकते, असे सांगण्यात येत आहे.

तर वनप्लस १२ ची किंमत वनप्लस ११ पेक्षा जास्त का असू शकते याची चार मुख्य कारणे पाहू…

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

१. कॅमेरा :

वनप्लस कंपनीने काही दिवसांपूर्वीच सांगितले की, आगामी वनप्लस १२ मध्ये वनप्लस ओपनप्रमाणेच कॅमेरा सेटअप असेल. ब्रँड त्याच्या आगामी फ्लॅगशिपच्या तुलनेत कॅमेऱ्यावर जास्त भर देत आहे.

२. वायरलेस चार्जिंग :

वनप्लस १२ मध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट ही सुविधा असेल. वनप्लसने सुरुवातीला वनप्लस ८ प्रोसह वायरलेस चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली होती. पण, वनप्लस ११ मध्ये ती सुविधा न मिळाल्यामुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आता वनप्लस १२ मध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा पुन्हा सादर करणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा…मोबाईल भिजला तर तांदळाच्या डब्यात ठेवायचा की नाही ? जाणून घ्या…

३. नवीन डिस्प्ले आणि बरेच काही :

वनप्लस १२ चे एक खास फीचर म्हणजे तुम्ही हा मोबाइल पाऊस पडत असताना किंवा भिजला तरीही ऑपरेट करू शकता. वनप्लस १२ मध्ये इन-हाउस ‘रेनवॉटर टच’ आहे. कंपनीने सुरुवातीला ही सुविधा वनप्लस Ace २ प्रोमध्ये उपलब्ध करून दिली होती. पाऊस पडत असताना किंवा तुमचा फोन भिजला तरीही या खास फीचरच्या मदतीने तुम्ही फोन सहज ऑपरेट करू शकता.

४. चिपसेट :

कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, वनप्लस १२ स्नॅपड्रॅगन ८ Gen ३ चिपसेटसह परिपूर्ण असेल. क्वालकॉमची नवीनतम हाय-एण्ड कम्पोनंट्सही ऑफर करते.

एकूणच ही कारणे आणि इतर काही फीचर्समुळे वनप्लस १२ ची किंमत वाढण्याची शक्यता आहे. सॅमसंग, गूगल व ॲपल यांसारख्या कंपन्यांनी फीचर आणि उत्कृष्ट परफॉर्मन्ससह फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमतींत सातत्याने वाढ केली आहे. त्याचप्रमाणे वनप्लसने यापूर्वी वनप्लस ९ सिरीज, वनप्लस १० प्रो व वनप्लस ११ च्या किमती वाढवल्या होत्या. तर, फीचर अपडेटसह वनप्लस १२ ची किंमत भारतात जास्त असेल, असे सांगण्यात येत आहे. तसेच वनप्लस १२ वर आधारित कोणतीही लीक करण्यात आलेली किंमत किंवा अधिकृत टीझर उपलब्ध नाहीत. याआधीचा मोबाईल लाँच आणि आगामी वनप्लस १२ च्या फीचर्सवर आधारित ही माहिती आहे..