चीनमध्ये पुन्हा करोनाचे उद्रेक होत आहे. त्यामुळे जगभरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या भारतामध्ये करोनाचा काही धोका नसला तरीदेखील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून गर्दीच्या ठीकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय नागरिकांनी करोनाबाबत सावधानता बाळगावी असंही सांगण्यात आलं आहे.

करोनापासून आपलं संरक्षण करण्यासाठी आणि योग्य ती काळजी घेण्यासाठी तुम्ही आतापासून काही वैद्यकीय उपकरणे खरेदी करु शकता. जी तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबतच्या अनेक अपडेट घरबसल्या देऊ शकतात. तर काही उपकरणांच्या मदतीने तुम्ही करोना नियंत्रणातही ठेवू शकता ती उपकरणं कोणती आहेत आणि त्यांच्या किमंती किती आहेत याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
hundred liver transplants at New Era Hospital in nagpur
अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?

हेही वाचा- करोनाच्या नव्या व्हिरियंटपासून स्वतःचे रक्षण करायचे आहे? तर आत्तापासून फॉलो करा ‘या’ सवयी

पल्स ऑक्सीमीटर –

रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे हे एक करोनाचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी स्थिर आहे की नाही हे तपासणं गरजेच आहे. तुम्ही पल्स ऑक्सिमीटरच्या साह्याने SpO2 च्या लेवल मोजू शकता. जर रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना त्याची कल्पना घेऊ शकता. पल्स ऑक्सिमीटरची किंमत ५०० ते ३००० रुपयांपर्यंत आहे.

डिजिटल ब्लड मॉनिटर –

सामान्य रक्तदाब श्रेणी ८०-१२० mm Hg च्या दरम्यान असते. ती कमी जास्त झाल्याचं तुम्ही डिजिटल ब्लड मॉनिटरच्या मदतीने मोजू शकता. हे उपकरणं खरेदी करताना एक काळजी घ्या ती म्हणजे, पल्स रेटसह येणारा मॉनिटर खरेदी करा. त्याची किंमत १५०० ते ३००० रुपयांपर्यंत आहे.

डिजिटल IR थर्मामीटर –

शरीराचे तापमान IR थर्मामीटरने संपर्करहित पद्धतीने मोजता येते. या थर्मामीटरच्या मदतीने तुम्ही १-२ इंचाच्या अंतरावरून शरीराचे तापमान मोजू शकता. यामुळे क्रॉस इन्फेक्शनची शक्यता कमी होते. या थर्मामीटरची ऑनलाइन साइट्सवर ९०० रुपये किमंत आहे.

हेही वाचा- करोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

रेस्पिरेटरी एक्सरसाइजर –

श्वसनाचे व्यायाम केल्याने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे रक्तातील संप्रेरकांचे अभिसरणही गतिमान होते. त्यामुळे हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांमध्ये रक्त प्रवाह वाढतो. बाजारात अनेक प्रकारची रेस्पिरेटरी एक्सरसाइजर उपकरणे उपलब्ध आहेत.

ग्लुकोमीटर –

ग्लुकोमीटर (Glucometer to track blood glucose levels) हे सर्वांसाठी आवश्यक नसलं तरी ते मधुमेहाच्या रुग्णासाठी गरजेचं असतं. मधुमेहाच्या रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासने आवश्यक असते. त्यासाठी ग्लुकोमीटरची गरज भासू शकते. ग्लुकोमीटरची किंमत ५०० रुपयांपासून सुरू होऊ शकते. ते ऑनलाइन आणि ऑफलाइन सहज उपलब्ध आहे.

हेही वाचा- Coronavirus: देशभरामध्ये परत मास्कसक्ती? केंद्र सरकार म्हणालं, “मास्क बंधनकारक करण्यासंदर्भात सध्या…”

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर –

आपण श्वास घेताना हवेतील नायट्रोजनसह इतर अशुद्ध घटत काढून टाकण्याचे काम ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर (Oxygen concentrator) करते. ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदी करताना, तुम्ही त्याची वॉरंटी, सत्यता यासारख्या गोष्टींचा विचार करू शकता. ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

पोर्टेबल ऑक्सिजन कॅनिस्टर –

योग्य वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत आपत्कालीन परिस्थितीत श्वासोच्छवासाची काळजी घेण्यासाठी पोर्टेबल ऑक्सिजन कॅनिस्टर एक आवश्यक असू शकते. परंतु याचा वापर केवळ शॉर्टटर्मसाठी केला जाऊ शकतो. ते दीर्घ कालावधीसाठी त्यावर अवलंबून राहता येत नाही.

स्टीमर –

स्टीमरचा वापर सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी केला जातो. स्टीमरमधून येणाऱ्या गरम वाफेमुळे घशाची जळजळ कमी होते.बाजारामध्ये स्टीमर ४०० रुपयांपासून सुरु होतात. ते सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे.

नेब्युलायझर मशीन –

या मशीनचा वापर जलद गतीने फुफ्फुसात ऑक्सिजन देण्यासाठी केला जाऊ शकतो. स्टीमरच्या विपरीत, नेब्युलायझर थंड वाफ देते. हे मशीन १५०० रुपयांपासून सुरू होतं ते ऑनलाइन सहज उपलब्ध आहे.

सेल्फ-क्लीनिंग मास्क –

सेल्फ-क्लीनिंग मास्क अँटीबैक्टीरियल-कोटिंगसह येतात. त्यांचा पुन्हा-पुन्हा वापर केला जाऊ शकतो. या मास्कमुळे वैद्यकीय कचरा कमी होण्यास मदत होते.

Story img Loader