उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे ज्याचा अर्थ घरामध्ये आता वीज बिल जास्त येण्याची शक्यता आहे. कारण या काळात घरामध्ये दिवस-रात्र एसी सुरू असतो. आज आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत सांगणार आहोत ज्या एसी वापरताना तुम्ही पाळल्यास तुमचे वीजबील कमी येऊ शकते. तुम्ही एसी वापरता पण जर तो योग्य पद्धतीने वापरला तर वीज बील कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. चला जाणून घेऊ या
खोलीच्या वातावरणानुसार एसीचे तापमान सेट करा
कित्येक लोक आपला खोली थंड करण्यासाठी एसी पूर्ण वेळ कमीत कमी तापमानाला सेट करतात. हा विचार चुकीचा आहे. तुम्ही जेवढे कमी तापमान ठेवाला खोलीचे तापमान त्या पातळीला आणण्यासाठी तेवढाच ताण एसीवर येईल आणि जास्त वीज वापरली जाईल. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE)नुसार, २४ डीग्री मानवी शरीरासाठी आदर्श तापमान आहे आणि कोणताही एसी या तापमान सेट करण्यासाठी कमी वेळ घेतो. तसेच वीज कमी वापरली जाईल.
हेही वाचा – स्मार्टफोनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स कसे ठेवावे? ‘या’ अॅपच्या मदतीने डाऊनलोड करू शकता सॉफ्ट कॉपी
खोली बंद ठेवा
ज्या खोलीत एसी बसवला आहे ती खोली शक्यतो बंद ठेवा. म्हणजेच खोलीची खिडकी आणि दरवाजे बंद ठेवण्याचा प्रयत्न करा आणि एसी, खिडकी किंवा दरवाजाच्या आजुबाजूला मोकळी जागा नसावी जिथून थंड हवा बाहेर जाऊ शकते. तुमच्याकडे इन्व्हर्टर एअर कंडिशनर असल्यास, तुम्हाला माहिती असेल की, इन्व्हर्टर तंत्रज्ञानामुळे, एसी बंद होत नाही, परंतु सेट तापमान गाठल्यावर तो अर्ध्या क्षमतेने चालतो. त्यामुळे जर हवा कुठूनही बाहेर जात असेल तर एसी सेट तापमानापर्यंत पोहोचणार नाही आणि पूर्ण क्षमतेने सतत चालत राहील आणि विजेचा वापर जास्त होईल.
एसीसह पंखा वापरा
छताच्या पंख्यामुळे खोली लवकरात लवकर थंड होते आणि तापमान कायम ठेवण्यासाठी खूप मदत होते. एसी ब्लोअर हवा एका मर्यादीत अतंरापर्यंत बाहेर फेकतो. अशावेळी ही थंड हवा पूर्ण खोलीत पसरवण्याचे काम पंखा करू शकतो. पण उन्हाळ्यामध्ये सिलींग फॅन खूप गरम असतो आणि विशेषत: जेव्हा तुम्ही वरच्या मजल्यांवर राहता तेव्हा पंख्याचा वेग कमी ठेवा
हेही वाचा – एअरटेलच्या ‘या’ पॅकमध्ये मिळवा १५ ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिपशन आणि फ्री डेटादेखील
ऋतूनुसार निवडा एसी मोड
आजकाल एअर कंडिशनर अनेक प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. यामध्ये अनेक ऑपरेटिंग मोड उपलब्ध आहेत. काही विजेची बचत करण्यासाठी आहेत, तर काही बाह्य हवामानानुसार कार्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. तुम्ही नेहमी योग्य मोड आणि फिचर्स वापरावे. काही एसीमध्ये एक पर्याय असतो ज्याद्वारे त्याची ऑपरेटिंग कार्यक्षमता ८०% ते २५% पर्यंत विविध स्तरांवर सेट केली जाऊ शकते. खोलीचा आकार आणि बाहेरील तापमानानुसार तुम्ही ही क्षमता निवडू शकता. दुसरीकडे, जर तुमच्या एसीमध्ये एनर्जी सेव्हर असेल तर तो नेहमी वापरा. तसेच, अधिक दमट हवामानात एसी Humid मोडवर चालवा.
हेही वाचा – WFH साठी मनमानी चालणार नाही, महिन्यातून १२ दिवस ऑफिसला या अन्यथा…; TCS ने कर्मचाऱ्यांना पाठवलेला मेमो चर्चेत
वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करणे खूप महत्वाचे
वाहनांप्रमाणेच, वेळोवेळी एसी सेवा घेतल्याने चांगली कामगिरी मिळते. एसी बाहेर लावलेले असतात, त्यामुळे त्याच्या अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये धूळ आणि कचरा साचतो. याचा एसीच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीत उन्हाळा आला की, प्रथम एसी सर्व्हिसिंग करून घ्या आणि इंजिनीअरकडून गॅसची तपासणी करून घ्या. जर गॅसची पातळी कमी असेल तर एसी खोलीला थंड करू शकणार नाही