Smartphones Launch January 2023 : २०२२ प्रमाणे या वर्षीही जबरदस्त फीचर्ससह अनेक स्मार्टफोन्स, उपकरणे गॅजेट प्रेमींच्या भेटीस येणार आहेत. गेल्या वर्षी आयफोन १४ सिरीज, सर्वात स्वस्त ५ जी फोन लावा ब्लेझ ५ जी आणि अनोखे फीचर्स असलेले अनेक फोन चर्चेत होते. या वर्षीही काही असे फोन्स लाँच होणार आहेत ज्यांच्याविषयी ग्राहक गेल्यावर्षीपासूनच उत्सुक आहेत. कोणते आहेत हे फोन्स? जाणून घेऊया.
१) आयक्यूओओ ११ ५ जी
iQOO 11 5G स्मार्टफोन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच होणार आहे. या फोनमध्ये सर्वाधिक वेगवान Snapdragon 8 gen 2 प्रोसेसर मिळणार आहे. फोनमध्ये एचडी प्लस रेझोल्युशन डिस्प्ले, ५००० एमएएच बॅटरी, ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी पर्यत स्टोअरेज, १२० वॉट फास्ट चार्जिंग हे फीचर्स मिळतात.
(१० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Nothing Phone 1, कुठे मिळतोय? जाणून घ्या)
२) रिएल मी जीटी निओ ५
Realme GT neo 5 स्मार्टफोन जानेवारी महिन्यात लाँच होणार आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन १ चिपसेट, १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोअरेज, प्रो व्हेरिएंटमध्ये २५० वॅट फास्ट चार्जर मिळेल. लिक्सनुसार, फोनच्या प्रो व्हेरिएंटमध्ये ४६०० एमएएच बॅटरी आणि २४० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल, तेच रिएलमी जीटी निओ ५ स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी आणि १५० वॉट फास्ट चार्जिंग मिळेल.
३) रेडमी नोट १२ ५ जी
Redmi Note 12 5G स्मार्टफोन ५ जानेवारी रोजी लाँच होणार आहे. कंपनीनुसार, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४ जेन १ प्रोसेसर, सुपर अमोलेड डिस्प्ले, ३३ वॅट फास्ट चार्जिंग, ४८ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा सेटअप मिळेल.
(Whatsapp ते Online payment, १ जानेवारी २०२३ पासून दिसून येतील ‘हे’ ४ बदल, जाणून घ्या)
४) सॅमसंग गॅलक्सी एफ ०४
Samsung Galaxy F04 स्मार्टफोन जानेवारी २०२३ मध्ये लाँच होऊ शकतो. लिकनुसार, फोनला दोन रंग पर्याय असतील. स्मार्टफोन ७ हजार ४९९ रुपयांमध्ये मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ४ जीबी व्हर्च्युअल रॅम मिळेल.
५) मोटो एक्स ४०
Moto X40 मोटो एक्स ४० स्मार्टफोन जानेवारी महिन्यात भारतात लाँच होईल. फोनमध्ये फूल एचडी अमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसर, ६० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोअरेज मिळेल. फोनमध्ये ४६०० एमएएच बॅटरी, १२५ वॅट वायर फास्ट चार्जिंग आणि १५ वॅट वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल.