देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून या निवडणूक १० फेब्रुवारी ते ७ मार्च या काळात ७ टप्प्यांमध्ये होतील. याच काळात देशात नवीन करोनाबाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून अनेक सुविधा प्रदान करण्यात येत आहेत. विशेषतः आता तुम्हाला नॉमिनेशन करण्यासाठी, वोटर आयडी घेण्यासाठी किंवा नावात बदल करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. ही सुविधा तुम्हाला घरबसल्याच मोबाईल अॅपच्या माध्यमातून दिली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याशिवाय, मतदानादरम्यान काही विसंगती आढळल्यास, तुम्ही या अॅप्सद्वारे तक्रार देखील करू शकता. यात तुमचं नावही समोर येणार नाही. याचप्रकारे अपंग लोकांकरिता देखील अॅप तयार करण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने ते मतदानासंबंधी अनेक कामं करू शकतात. आज आपण निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अॅप्सबद्दल माहिती मिळवणार आहोत. हे अॅप्स उमेदवारांपासून ते निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच उपयोगी पडतील.
‘या’ अॅपच्या मदतीने करा नॉमिनेशन
जे उमेदवार त्यांच्या विधानसभा मतदारसंघापासून दूर आहेत ते उमेदवार ‘सुविधा पोर्टल‘वरून ऑनलाइन नॉमिनेशन फाइल करू शकतात. यासाठी सर्वप्रथम उमेदवाराला या सुविधा पोर्टलवर आपलं अकाउंट बनवावं लागेल. अकाउंट उघडण्यासाठी उमेदवाराला आपला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. यानंतर नंबरवर आलेला ओटीपी टाकावा लागेल. लॉगिन केल्यानंतर उमेदवाराला सुरक्षा रक्कम भरावी लागेल. यानंतर पॅन कार्ड किंवा आधार कार्डची माहिती द्यावी लागेल. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट रिटर्निंग ऑफिसरकडे जमा करावी.
ऑनलाइन मतदान करता येणार
इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम (ईटीपीबीएस) च्या मदतीने मतदार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. ईटीपीबीएसमुळे तुमच्या मतदानात कोणतीही अडचण येणार नाही. मत देताना मोबाइलवर ओटीपी आणि पिनकोड तयार होईल.
सीव्हीजीआयएल अॅप (CVIGIL App)
जर कोणता उमेदवार आचारसंहितेचे उल्लंघन करत असेल तर तुम्ही या अॅपच्या मदतीने त्याची तक्रार करू शकता. व्हिडीओ आणि फोटो अपलोड केल्यानंतर माहिती योग्य असल्यास १०० मिनिटात संबंधित उमेदवारावर कारवाई केली जाईल. याअंतर्गत केवळ ५ मिनिटात स्थानिक अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार पोहचेल. तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवली जाईल.
पीडब्लूडी अॅप (PWD App)
या अॅपच्या मदतीने अपंग लोकांना सेवा प्रदान केली जाते. तसेच, नवीन नाव नोंदणीसाठी विनंती, स्थलांतर, ईसीपीआयमध्ये बदल यासारख्या सुविधा दिल्या जातात. याशिवाय, या अॅपच्या मदतीने अपंगांना घरापासून मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी मोफत वाहनाचा वापर करता येणार आहे.
वोटर टर्नआऊट अॅप (Voter Turnout App)
कोणत्या विधानसभेत किती लोकांनी मतदान केले आहे याबाबतची माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळेल. यामध्ये, रिअलटाइम वारंवार अपडेट केला जातो आणि जागानिहाय माहिती उपलब्ध होते.
वोटर हेल्पलाइन अॅप (Voter Helpline App)
या अॅपच्या मदतीने कोण जिंकलंय आणि कोण हरलंय हे आपण फक्त एका क्लिकवर जाणून घेऊ शकतो. आपल्या विभागातील उमेदवाराला किती मतं मिळाली, तसेच मतदानाची टक्केवारीही आपण या अॅपच्या मदतीने जाणून घेऊ शकतो.
नॅशनल वोटर सर्विस (National Voter Service)
या अॅपच्या मदतीने आपण नवीन मतदान कार्डसाठी अर्ज करू शकतो. तर जुने मतदार कुठूनही निवडणूक ओळखपत्र काढून त्यात कोणतेही बदल करू शकतात.