ऋतूचक्रानुसार मान्सूनचे चार महिने संपत आले असताना, पावसाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. अशात दररोज कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना याचा फार त्रास होतो. तसेच पावसामुळे सर्दी, ताप असे आजार लगेच पसरतात. या सर्व त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी जर मुसळधार पाऊस येणार असेल तर त्याचा अंदाज आपल्याला असेल, तर तशी तयारी करून बाहेर निघू किंवा अशावेळी बाहेर जाण्याचे टाळू असे आपल्याला वाटते. ही माहिती जर तुम्हाला आधीच मिळवायची असेल तर काही अॅप्स तुमची मदत करू शकतात. हवामानाचा अंदाज वर्तवणारे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत, पण त्यातील सर्वात उत्तम आणि लोकप्रिय अॅप्स कोणते आहेत जाणून घेऊया.
हवामानाचा अंदाज वर्तवणारे सर्वोत्तम अॅप्स
आणखी वाचा : आता गूगल सर्चमधून बुक करता येणार ट्रेनचे तिकीट? काय आहे नवीन फीचर जाणून घ्या
Weather- Live & forecast
हे अॅप्स अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. याला ५ पैकी ४.७ स्टार रेटिंग मिळाले आहे. आत्तापर्यंत १ लाखांहून अधिक जणांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. यामध्ये तुम्हाला हवेच्या गुणवत्तेपासून दररोजचे हवामान अशा प्रकारची माहिती दिली जाईल. हे अॅप फ्रीमध्ये डाउनलोड करता येते.
Weather Apps- Weather Live
प्ले स्टोरवर या अॅपला ४.६ रेटिंग आहे. ५० लाखांहून अधिक जणांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. हे अॅप तुम्हाला रिअल टाइम हवामान रडार देते. तसेच यामध्ये लोकल आणि नॅशनल असे पर्याय देण्यात आले आहेत. इथून दर तासाला हवामान कसे असेल याची माहिती मिळू शकते. हे अॅप फ्री डाउनलोड करता येते.
आणखी वाचा : व्हाट्सअॅपमधील ‘या’ सेटिंगमुळे होऊ शकतो फोन हॅक; लगेच करा बदल
Weather & Radar India
याला ४.२ रेट केले गेले आहे. ५ कोटींहून अधिक जणांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. यामध्ये हवामान थेट रडार नकाशे, मान्सून पावसाचा अंदाज, फार्म वेदर, ७ ते १४ दिवसांचा लोकल वेदर फोरकास्ट यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. तुम्ही हे अॅप फ्री डाउनलोड करू शकता.