Airtel Prepaid Plans: भारतीय दूरसंचार कंपन्यांच्या यादीत एअरटेल कंपनी दुसऱ्या क्रमांकाची सेवा देणारी कंपनी आहे. महागड्या रिचार्ज प्लॅन उपलब्ध असूनही, बरेच वापरकर्ते अजूनही नेटवर्कनुसार एअरटेल कंपनी निवडतात. कंपनीच्या २५० रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅन निवडण्याबद्दल कंपनी वापरकर्त्यांना उत्तम पर्याय ऑफर करते. कंपनीच्या अशा ५ सर्वोत्तम रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती जाणून घ्या, जे तुम्हाला २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील.
‘हे’ आहेत प्लॅन
१. परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या या यादीतील सर्वात कमी किमतीच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची किंमत ९९ रुपये आहे. ९९ रुपयांच्या किमतीत, एअरटेल कंपनी आपल्या ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह २००MB डेटा आणि ९९ रुपयांचा टॉकटाइम प्रदान करते. टॉक टाइममध्ये, कंपनी वापरकर्त्यांकडून १ पैसे प्रति सेकंद आकारते.
(हे ही वाचा: १० हजाराहून कमी किमतीचा आणि उत्तम बॅटरी असलेला स्मार्टफोन Tecno Pop 5 Pro भारतात लाँच; जाणून घ्या तपशील)
२. ९९ रुपयांनंतर, कंपनीचा पुढील परवडणारा पर्याय १५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन असू शकतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना २४ दिवसांपर्यंत वैधता मिळते.फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात १GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा समावेश आहे.
(हे ही वाचा: रियलमीचे Realme 9 Pro आणि Plus लवकर भारतात होणार लॉंच, असेल ५G तंत्रज्ञानाने सुसज्ज)
३. १GB पेक्षा जास्त डेटाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, तुम्ही एअरटेलच्या १७९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवचा विचार करू शकता. हा प्लॅन तुम्हाला २८ दिवसांच्या वैधतेसह २ GB डेटा, अमर्यादित कॉलिंग सुविधा देतो.
४. २०९ रुपयांचा प्लॅन आहे, ज्याची वैधता २१ दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा मिळतो. २१ दिवसांच्या वैधतेनुसार, ग्राहकांना प्लॅनमध्ये एकूण २१ GB डेटा मिळतो. डेटा व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० विनामूल्य एसएमएस समाविष्ट आहेत.
(हे ही वाचा: Jio vs Airtel: 2GB डेटा देणारा कोणता आहे बेस्ट प्लॅन? जाणून घ्या)
५. एअरटेलचा २३९ रुपयांचा प्लॅन २४ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे २०९ रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत. तथापि, २४ दिवसांच्या वैधतेनुसार, या प्लॅनमध्ये तुम्हाला २४ GB डेटा मिळतो.