बहुतेक लोकं जीमेल वापरतात. मेसेज पाठवण्यापासून ते महत्त्वाची कागदपत्रे शेअर करण्यासाठी जीमेलचा वापर केला जातो. त्याच वेळी, आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे २०२३ या नवीन वर्षात Gmail वापरणे अगदी सोपे होईल. यामध्ये तुम्हाला कीबोर्ड शॉर्टकट चांगल्या प्रकारे कसे वापरायचे तसंच इनबॉक्स मधील नको असलेले संदेश तसंच इनबॉक्स मधील जास्त जागा व्यापत असणारे संदेश डिलीट कसे करायचे याबाबत सांगणार आहोत…
कीबोर्ड शॉर्टकट तपासा
तुम्हाला माहित आहे का की जीमेल मध्ये तुम्ही माउसचा वापर न मारता संदेश पाठवू शकता. तुम्ही Ctrl+Enter दाबल्यास तुमचा संदेश सेंड होईल. यामध्ये तुम्हाला माउसद्वारे send ऑप्शनवर क्लिक करायची गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मजकुरात Alt+Shift+5 दाबून स्ट्राईकथ्रू जोडू शकता. जीमेल मध्ये असे वेगवेगळे शॉर्टकट्स उपलब्ध आहेत.
इनबॉक्स मधील मोठे संदेश अशाप्रकारे शोधा आणि हटवा
तुमच्या इनबॉक्समध्ये बरेच मेल असतील. ज्याने तुमच्या इनबॉक्समधील जागा दिवसेंदिवस भरत असेल. जर तुमच्या इनबॉक्स मध्ये जास्त एमबी असलेले संदेश असतील तर हे सर्व इमेल गुगलच्या १५जीबी फ्री स्टोरेजमध्ये बसवणे कठीण आहे. यासाठी जीमेलकडे एक युक्ती आहे. ज्याद्वारे इनबॉक्समध्ये असलेले सर्व मोठे संदेश तुम्ही शोधून एकाचवेळी हटवू शकता. यासाठी जीमेलमधील सर्च बारवर जा आणि ‘size:10’ टाइप करा, यामुळे तुम्हाला १०MB साइज वरील सर्व संदेश सापडतील. तसंच ‘size२०’ सर्च कराल तर तुम्हाला २०MB साइज वरील सर्व संदेश मिळतील. तुम्ही नको असलेले हे सर्व संदेश एकत्रितपणे हटवू शकता आणि इनबॉक्स मधील जागा रिकामी ठेवू शकता.
( हे ही वाचा; New Year 2023 : नवीन वर्षानिमित्त Special Gift द्यायचंय? मग ‘या’ ९ ‘Gadgets’चा करू शकता विचार)
कलर कोडेड स्टारचा वापर करा
लोक महत्त्वाच्या संदेशांसाठी जीमेल स्टार वापरतात. परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल की Gmail अनेक कोडेड स्टार महत्त्वाचे संदेश ओळखण्याची परवानगी देतो. त्याच्या मदतीने, तुम्ही वेगवेगळे संदेश स्टारद्वारे ओळखू शकता किंवा तुम्ही त्याचे वर्गीकरण करू शकता.