देशात मेबाईलची मागणी वाढली आहे. तसेच, आता ५ जी सेवा सुरू झाल्याने वेगवान इंटरनेटचा आनंद घेण्यासाठी ग्राहक ५ जी मोबाइल्सना प्राधान्य देत आहेत. तुम्ही आकर्षक, दमदार फोन घेण्याचा विचार करत असाल तर डिसेंबर महिन्यात काही नवीन फोन लाँचसाठी सज्ज आहेत. फास्ट चार्जिंग, उत्तम प्रोसेसर आणि मोठी स्क्रीन ही वैशिष्ट्ये हवी असणाऱ्या ग्राहकांनी या पर्यायांवर एक नजर टाकायलाच हवी.

१) रिअलमी १० प्रो सिरीज

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून

Realme 10 Pro Series भारतात ८ डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. रिअलमीचे फोन भारतात लोकप्रिय आहेत. जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि इतर फीचर्स तेही परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करत असल्याने ग्राहक त्यांच्या फोन्सकडे आकर्षिला जातो. रिअलमीच्या नवीन सिरीजमध्ये realme 10 pro आणि realme 10 pro + या स्मार्टफोनचा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये नवीन अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आले असून छायाचित्र काढण्यासाठी मागे १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

(अमेझॉनवर बजेट इअरबड्स उपलब्ध, किंमत १ हजारांच्या आत, १० तासांपेक्षा अधिक प्लेटाईम, पाहा यादी)

२) रेडमी नोट १२

Redmi Note 12 सिरीज चीनमध्ये लाँच झालेली आहे. या सिरीजमध्ये Redmi Note 12, Note 12 Pro आणि Note 12 Plus या तीन फोन्सचा समावेश आहे. तिन्ही स्मार्टफोन्समध्ये ५ जी सपोर्ट मिळतो. कंपनी भारतात सुरुवातील Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ हे दोन स्मार्टफोन लाँच करू शकते. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० चिपसेट आणि ५० एमपीचा कॅमेरा मिळतो. फोन शालो ड्रिम गॅलक्सी आणि टाईम ब्ल्यू या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

३) आयक्यूओओ ११

iQoo 11 सिरीज ८ डिसेंबरला लाँच होणार आहे. या सिरीजमध्ये iQoo 11 आणि iQoo 11 Pro हे दोन फोन उपलब्ध आहेत. दोन्ही फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसर असेल. आयक्यूओओ ११ प्रो २०० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर होईल. आयक्यूओओ ११ लेजेंड आणि अल्फा या दोन एडिशनमध्ये उपलब्ध होईल, तर आयक्यूओओ ११ प्रो हा अल्फा, लेजेंड आणि मिंट ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध होईल.

(जिओचे २०० रुपयांखालील प्लान्स पाहिलेत का? UNLIMITED CALLS, इंटरनेटसह मिळतंय बरच काही, पाहा यादी)

४) सॅमसंग गॅलक्सी एम ०४

Samsung Galaxy M04 पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. आयएएनएसच्या अहवालानुसार, हा फोन रॅम प्लस फीचरसह उपलब्ध होऊ शकतो. या फीचरद्वारे युजरला फोनची रॅम वाढवता येऊ शकते. फोन १० हजार रुपयांच्या आत मिळू शकतो. फोनमध्ये मीडियाटेक प्रेसेसर आणि ५ हजार एमएएचची बॅटरी मिळू शकते.