एका स्मार्टफोन निर्मात्याने घोषणा केली आहे की येत्या ४ जानेवारीपासून त्यांच्या स्मार्टफोन्सवरील सेवा आता पूर्णपणे बंद होणार आहेत. म्हणजेच तुम्ही ते स्मार्टफोन वापरत असाल तर त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. खरं तर, आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनच्या वर्चस्वाच्या आधी ब्लॅकबेरीचा एका लोकप्रिय फोनचा ब्रँड म्हणून दबदबा होता. २००० साली किंवा त्यापूर्वी लोकांना हा फोन मिळणं ही मोठी गोष्ट होती. पण आता हळुहळू आता या कंपनीची ताकद स्मार्टफोन मार्केटमध्ये कमी होत आहे.
आता कंपनीने अलीकडेच आपल्या युजर्सना चेतावनी दिली आहे की ती कंपनी आपल्या सर्व क्लासिक स्मार्टफोन मॉडेल्सना पाठबळ देणं बंद करणार आहे. याचा अर्थ असा की, जर कोणी वापरकर्ते ब्लॅकबेरी क्लासिक स्मार्टफोन वापरत असतील तर त्यांना त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ते स्मार्टफोन वापरू शकणार नाहीत.
आणखी वाचा : WhatsApp ने १७.५ लाखाहून अधिक भारतीय खाती बंद केली, जाणून घ्या काय आहे कारण ?
कंपनीने माहिती दिली आहे की ती BlackBerry OS, 7.1 OS, PlayBook OS 2.1 मालिका आणि BlackBerry 10 वर चालणार्या स्मार्टफोन्सवर सपोर्ट बंद करेल. तसेच, अपडेट करणे देखील बंद केले जाईल.
आणखी वाचा : Indian Railway IRCTC या मार्गांवरील १४ गाड्या रद्द, प्रवास करण्यापूर्वी ही यादी पहा
सपोर्ट बंद झाल्याने कोणत्या गोष्टी वापरता येणार नाहीत ?
ब्लॅकबेरी क्लासिक स्मार्टफोन वापरत असल्यास, ४ जानेवारीपासून कंपनीचे अधिकृत पाठबळ थांबल्यानंतर, ब्लॅकबेरी क्लासिक स्मार्टफोन वापरकर्ते डिव्हाइसवरील कॉलिंग, डेटा ऍक्सेस, एसएमएस आणि नंतर इमर्जेंसी यांसारखी सर्व फिचर्स बंद होतील. मात्र, नवा नियम फक्त क्लासिक स्मार्टफोनवरच लागू होईल. दुसरीकडे, ब्लॅकबेरीच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे स्मार्टफोन अजूनही वापरता येतील.
आणखी वाचा : तुमच्या फोनमधील फोटोमधून वैयक्तिक डेटा लीक होऊ शकतो, टाळण्यासाठी ही सेटिंग करा
लवकरात लवकर बॅकअप घ्या
जर तुम्ही हा स्मार्टफोन वापरत असाल, तर तुम्हाला कंपनीने लवकरात लवकर त्याचा बॅकअप घेण्याचा सल्ला दिला आहे, अन्यथा तुम्ही या स्मार्टफोनमधून आवश्यक डेटा घेऊ शकणार नाही. या व्यतिरिक्त, जर तुम्ही अँड्रॉइड ब्लॅकबेरी स्मार्टफोन देखील वापरत असाल तर, शक्य तितक्या लवकर तुमच्या फोनचा डेटा बॅकअप घ्या. तुम्ही बॅकअप घेऊन नवीन डिव्हाइसवर वापरू शकता.