Coffee maker machine : तुम्हाला कॉफी पिणे आवडते, मात्र ती बनवता येत नसेल तर कॉफी मेकर चांगला पर्याय ठरू शकतो. कॉफी मेकर हे उपकरण वेळेत तुमच्यासाठी कॉफी तयार करते. यास इन्स्टंट कॉफी मेकरसुद्धा म्हणतात. मात्र, कॉफी मेकर घेताना पुढील बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजे.
१) क्षमता
कॉफी मेकर दोन प्रकारचे असतात. एका प्रकारात तुम्ही केवळ एक कप कॉफी बनवू शकता, तर दुसऱ्या प्रकारात अनेक लोकांसाठी कॉफी तयार होऊ शकते. त्यामुळे, कॉफी मेकर घेताना आपल्या आवश्यकतेनुसार घ्या.
(AIRTEL 5G: कोणत्या शहरांमध्ये एअरटेल ५ जी सेवा उपलब्ध? जाणून घ्या संपूर्ण माहिती)
२) कराफ कॉफी मेकर
कॉफी जिथे साठवून असते त्यास कराफ म्हणतात. थर्मल कराफ कॉफी मेकर खरेदी केल्यास तुमची कॉफी दीर्घकाळ गरम राहील.
३) ग्राइंडर
तुम्हाला पॅकेटमध्ये मिळणाऱ्या कॉफी पावडर ऐवजी कॉफी बिन्स भरडून तयार झालेल्या पावडरची कॉफी हवी असेल तर कॉफी मेकर मशीनमध्ये ग्राइंडर असणे गरजेचे आहे. तुम्ही ग्राइंडर असलेले कॉफी मेकर घेऊ शकता.
(‘PTRON’ने सादर केला जबरदस्त नेकबँड, सिंगल चार्जवर ६० तासांच्या बॅटरी लाइफचा दावा, किंमत केवळ..)
४) फिल्टर
कॉफी मशीनमध्ये पाणी स्वच्छ करण्याचे फिल्टर असणे गरजेचे आहे. हे फिल्टर दुर्गंधी आणि क्लोरीन काढून टाकते आणि चांगली चव देणारी कॉफी देते.