अनेकांना ‘कॅण्डी क्रश’ या मोबाइल गेमने वेड लावलंय. या खेळाच्या विविध लेव्हल्स, त्या पूर्ण करण्याचे मार्ग, मोबाइलसह फेसबुकवरही खेळता येण्याची सोय, ऑनलाइन खेळण्याचा बोलबाला, मित्रपरिवारात सुरू असलेली चढाओढ या साऱ्यामुळे कॅण्डी क्रश प्रेमींनी याच्या लेव्हल्स पूर्ण करण्याचा जणू विडाच उचललाय. कॅण्डीक्रश आवडणाऱ्यांमध्ये सगळ्या वयोगटातली मंडळी आहेत. पण काहीजण केवळ गंमत म्हणून या खेळाचा वापर करतात.
या गेममध्ये एका लाइनमध्ये गोल, चौकोनी, अंडाकृती आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या कॅण्डीज आणि चॉकलेट्स असतात. एकाच रंगाच्या तीन कॅण्डीज, चॉकलेट्स एकत्र आडव्या किंवा उभ्या रेषेत आणाव्या लागतात. त्या एकत्र आल्या की त्या क्रश होतात आणि एकेक पायरी पुढे जात राहतो. यामध्ये मॅजिक बॉल, बोनस पॉइंट, लाइफलाइन असे प्रकार आहेत.
WhatsApp घेऊन येत आहे जबरदस्त फीचर्स; फोटो आणि व्हिडीओ एडिट करणं होणार सोपं
साल २०२२च्या सुरुवातीलाच गेमिंग सेक्टरमध्ये एक मोठी डील केली जाणार आहे. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी लोकप्रिय गेम ‘कॅण्डी क्रश’ आणि ‘कॉल ऑफ ड्युटी’ बनवणारी कंपनी अॅक्टिव्हिजन ब्लिझार्डला विकत घेणार आहे. ही डील ६८.७ अरब डॉलर म्हणजेच जवळपास ५ लाख कोटी रुपयांची असणार आहे. तसेच ही डील संपूर्णपणे कॅशमध्ये केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. गेमिंग क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील असून या करारामुळे ‘एक्सबॉक्स’ बनवणारी मायक्रोसॉफ्ट, कमाईच्या बाबतीत तिसरी सर्वात मोठी गेमिंग कंपनी बनणार आहे.
सध्याच्या किमतीपेक्षा ४५% अधिक दराने केला व्यवहार
मायक्रोसॉफ्टने गेमिंग कंपनी अॅक्टिव्हिजन ब्लिझार्डला ९५ डॉलर प्रति शेअर किंमतीला विकत घेण्याची ऑफर दिली आहे. हा दर अॅक्टिव्हिजन ब्लिझार्डच्या सध्याच्या किमतीपेक्षा ४५% अधिक आहे. मंगळवारी अॅक्टिव्हिजन ब्लिझार्डचे शेअर्स ३८ टक्क्यांनी वाढून ६५.३९ डॉलर झाले होते.
“गेमिंग ही आज सर्व प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची सर्वात गतिमान आणि रोमांचक श्रेणी आहे आणि मेटाव्हर्स प्लॅटफॉर्मच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.” असे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्य नाडेला यांनी म्हटलंय. करोना महामारीनंतर व्हिडिओ गेम्सच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. लॉकडाउनमुळे घरात अडकलेल्या वापरकर्त्यांनी स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी अधिक वेळ गेम खेळण्यास सुरुवात केली.
एक्सबॉक्स (Xbox) गेमिंग प्लॅटफॉर्मवर आणखी गेम्स मिळणार
गेमिंगमध्ये सोनीच्या प्लेस्टेशनवर वर्षानुवर्षे विशेष गेम येत आहेत, त्यामुळे त्यांचे बाजारात वर्चस्व आहे. तथापि, या करारानंतर, “कॉल ऑफ ड्यूटी” आणि “ओव्हरवॉच” सारखे लोकप्रिय गेम मायक्रोसॉफ्टच्या Xbox गेमिंग प्लॅटफॉर्मवर जोडले जातील. यामुळे मायक्रोसॉफ्टला या व्यवसायात वाढ मिळेल. या करारानंतर बॉबी कॉटिक अॅक्टिव्हिजन ब्लिझार्डचे सीईओ म्हणून काम करत राहतील असे कंपनीने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात, टेक-टू-इंटरअॅक्टिव्ह सॉफ्टवेअर इंक. या आणखी एका व्हिडीओ गेम निर्मात्याने घोषित केले की ते ‘फार्म विल’ (FarmVille) हा गेम बनवणारी कंपनी झिंगाला (Zynga) ११ अरब डॉलरच्या डीलमध्ये विकत घेणार आहे.