गुगलने ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास फीचर आणलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही ट्रेनचे लाईव्ह लोकेशन जाणून घेऊ शकाल. यासोबतच स्टेशनवरील प्लॅटफॉर्म बदलल्यानंतरही तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. अनेक वेळा लोकांना ट्रेनबद्दल अचूक माहिती न मिळाल्यामुळे ट्रेन चुकतात. पण गुगलच्या लाइव्ह ट्रेन लोकेशन फीचरच्या मदतीने आता प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही.

Google ने या अॅपसह भागीदारी केली आहे – Google Maps ने लाइव लोकेशनसाठी where is my train अॅपसोबत पार्टनरशीप केली आहे. गुगल मॅपच्या या फीचरचा युजरना चांगलाच उपयोग होऊ शकतो. विशेषत: ज्या यूजर्सच्या फोनमध्ये कमी स्टोरेजची समस्या आहे. या अॅपद्वारे आता युजरना ट्रेनची आगमन वेळ, वेळापत्रक, ट्रेनच्या विलंबाची माहिती आणि इतर अनेक माहिती अॅपवर मिळू शकणार आहे.

देशभरात काम करणार – गुगल मॅपचे हे फीचर देशभरातील सर्व शहरांमध्ये काम करेल. याच्या मदतीने तुम्ही ट्रेन नंबरच्या मदतीने थेट लोकेशन शोधू शकाल. याशिवाय स्टेशनवर प्लॅटफॉर्म बदलण्याबाबतही माहिती सहज मिळेल.

आणखी वाचा : Airtel चा आणखी एक प्लॅन लॉन्च, Amazon प्राइम सबस्क्रिप्शनसह 200Mbps डाउनलोड स्पीड, फ्री कॉलिंग आणि बरंच काही

असे अॅप वापरा

  • यासाठी आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप्स अॅप ओपन करावे लागेल.
  • यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला जिथे जायचे आहे ते ठिकाण टाकावे लागेल.
  • यानंतर, जिथे तुम्हाला टू व्हीलर आणि वॉक दरम्यान ट्रेन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • येथे तुम्हाला त्या मार्गावर जाणाऱ्या सर्व गाड्यांची नावे दिसतील.
  • आता थेट ट्रेन स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या ट्रेनच्या नावावर क्लिक करावे लागेल.
  • येथे युजरना त्या मार्गावर येणाऱ्या सर्व स्थानकांची नावे देखील पाहता येतील.

Story img Loader