जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या एलॉन मस्क यांनी काही दिवसांपुर्वी ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग कंपनी विकत घेतली. त्यानंतर ट्विटरबाबत कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करणे, व्हेरिफिकेशन ब्ल्यू टिकबाबत बदल, हजारो कर्मचाऱ्यांना बडतर्फ असे अनेक मोठे आणि वादग्रस्त निर्णय घेण्यात आले. त्यामुळे गेले काही दिवस एलॉन मस्क यांनी ट्विटर दोन्ही चर्चेचा विषय ठरत आहेत. आता चर्चेचा एक नवा मुद्दा यात समाविष्ट झाला आहे, तो म्हणजे ट्विटर मुख्यालयाचे बदललेले स्वरूप.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटर मुख्यालयाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ट्विटर मुख्यालयातील काही भाग बेडरूम्समध्ये बदलण्यात आल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना नव्या कामाच्या पद्धतीमुळे थकवा जाणवत असेल, तर ते इथे आराम करू शकतात. या बेडरूम्समध्ये कपाट, बेड, वॉशिंग मशीन अशा सर्व सोयी असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा: WhatsApp अवतार फीचर पाहिले का? कसे वापरायचे लगेच जाणून घ्या

फोर्ब्सने दिलेल्या रिपोर्टनुसार ट्विटर मुख्यालयाच्या बिल्डिंगमधील प्रत्येक माळ्यावर अशा चार ते आठ बेडरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हायरल होणारे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनाही या बदललेल्या स्वरूपावर आश्चर्य व्यक्त केले आहे.