Reliance Jio: रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास प्लॅन ऑफर करतात. ज्यामध्ये तुम्ही अधिक डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. तथापि, हे प्लॅन थोडे महाग असू शकतात. पण आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत अधिक डेटा, अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि इतर सेवांचा लाभ मिळू शकतो.
१९९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओने ऑफर केलेला जिओचा एक प्लॅन १९९ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत. तसेच यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. याशिवाय तुम्ही जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा अॅपचा मोफत लाभ घेऊ शकता. हा प्लॅन २३ दिवसांच्या वैधतेसह येतो.
११९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये १.५ जीबी पर डे नुसार २१ जीबी डेटासह १४ दिवसांसाठी ३०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय तुम्ही जिओच्या सेवा जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा चाही लाभ घेऊ शकता.
(हे ही वाचा: आता तुमची शेवटच्या १५ मिनिटातील सर्च हिस्ट्री ‘अशी’ करू शकता डिलीट; आलं नवीन Google’s App)
१ जीबी डेटा प्लॅन
दुसरीकडे, जर तुम्हाला कमी डेटा प्लॅन वापरायचा असेल आणि दररोज १ जीबी डेटा खर्च करायचा असेल, तर तुम्हाला अधिक दिवसांसाठी वैधता दिली जाते. यासोबतच तुम्हाला इतर काही सेवांचा लाभही मिळतो. या विभागात तीन रिचार्ज योजना आहेत.
१७९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला १ जीबी डेटानुसार दररोज २४ जीबी डेटा दिला जातो. दररोज १०० एसएमएस सोबत, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सुरक्षा आणि जिओ क्लाउड सुविधा अमर्यादित कॉलिंग आणि सबस्क्रिप्शनमध्ये दिली जाते. त्याची वैधता २४ दिवसांसाठी आहे.
१४९ रुपयांचा प्लॅन
यामध्ये तुम्हाला २० दिवसांसाठी १ जीबी /पर डे दराने २० जीबी डेटा दिला जातो. यासोबतच तुम्हाला दररोज १०० एसएमएस सुविधेचा लाभही दिला जातो. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा दिले आहेत.
डेटा व्हाउचर प्लॅन
जर तुमच्याकडे आधीच रिचार्ज असेल, परंतु प्रत्येक दिवसाचा डेटा कोटा संपला असेल, तर डेटा व्हाउचर प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. १२१ रुपयांमध्ये १२ जीबी डेटा, ६१ रुपयांमध्ये ६ जीबी आणि २५ रुपयांमध्ये २ जीबी डेटा दिला जातो. या सर्वांची वैधता तुमच्या अमर्यादित रिचार्जपर्यंत वैध राहते. याशिवाय १८१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी ३० जीबी डेटा मिळतो.