सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सशी (ट्विटर) स्पर्धा करण्यासाठी मेटाने थ्रेड्स (Threads) हे नवीन ॲप काही महिन्यांपूर्वी लाँच केलं. तुम्ही इन्स्टाग्राम (Instagram ) युजर असाल, तर तुम्हाला थ्रेडसाठी वेगळे खातं तयार करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त थ्रेड्स अ‍ॅप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर थ्रेड्स अ‍ॅप आपोआप लॉगिन (Login) होईल. इन्स्टाग्राम अ‍ॅप थ्रेड्सशी लिंक (Link ) असल्यामुळे जर तुम्ही थ्रेड प्रोफाइल डिॲक्टिव्हेट (Deactivate) केलं, तर तुमचं इन्स्टाग्राम अकाउंटदेखील डिॲक्टिव्हेट होऊ शकतं. ही गोष्ट जेव्हा वापरकर्त्यांना समजली तेव्हा यावर अनेक मीम तयार केलं आणि प्रत्येकाच्या मनात आपलं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट (Delete) होईल याची भीती निर्माण झाली.

पण, आता या सगळ्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या वारंवार विनंतीनंतर आता तुम्ही थ्रेड प्रोफाइल स्वतंत्र डिॲक्टिव्हेट करू शकता. लवकरच हा पर्याय सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी सांगितलं की, इन्स्टाग्राम खात्यापासून स्वतंत्र थ्रेड्स प्रोफाइल हटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण

कंपनीकडून ॲप अपडेट केला जाईल जेव्हा थ्रेड प्रोफाइल डिलीट करण्यासाठी पायऱ्या पुढीलप्रमाणे असतील :

१. सगळ्यात आधी तुमच्या फोनमधील थ्रेड्स ॲपवर क्लिक करा.
२. तळाशी उजवीकडे असलेल्या प्रोफाइल बटणावर क्लिक करा. नंतर स्क्रीनच्या वर उजव्या बाजूला दिसणाऱ्या दोन रेषा दिसतील तिथे क्लिक करून ॲपच्या सेटिंगमध्ये जा आणि आता अकाउंट या पर्यायावर (Account) क्लिक करा
३. तुम्हाला तिथे दोन पर्याय दिसतील. प्रोफाइल डिलीट करा किंवा डिॲक्टिव्हेट करा (Delete or Deactivate profile).
४. जर तुम्ही यातील डिॲक्टिव्हेट या पर्यायावर क्लिक केलं, तर तुमच्या प्रोफाइलमधील सर्व पोस्ट (Post) अर्काइव्ह (Archive) होतील.
५. आणि जर डिलीट हा पर्याय तुम्ही क्लिक केलात, तर तुमचे थ्रेड प्रोफाइल डिलीट होईल आणि याचा तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काहीही परिणाम होणार नाही.

हेही वाचा…सावधगिरी बाळगा! व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे ‘हे’ मेसेज धोकादायक; चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा…

हा पर्याय कधीपासून युजर्ससाठी उपलब्ध होईल?

इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी सांगितलं की, थ्रेड प्रोफाइल डिलीट करण्याचा पर्याय लगेच सगळ्यांसाठी लगेच उपलब्ध होणार नाही. आम्ही ॲपला अपडेट करण्याचा प्रयत्न केला आहे; पण आम्हाला हा पर्याय अजून दिसला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

आतापर्यंत मेटानं थ्रेड्स खातं वापरकर्त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइल लिंक केलं होतं. त्यामुळे वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामवर लॉगिन केल्यानंतर थ्रेड प्रोफाइलमध्ये जाण्याची परवानगी मिळायची. पण, यापूर्वी ज्यांनी ज्यांनी थ्रेड्स प्रोफाइल डिलीट केलं असेल त्यांनी त्यांचं इन्स्टाग्राम अकाउंटदेखील गमावलं आहे, असं इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी सांगितलं. पण, आता लवकरच कंपनीकडून ॲप अपडेट केलं जाईल आणि इन्स्टाग्रामवर परिणाम न होता, तुमचं थ्रेड प्रोफाइल डिॲक्टिव्हेट होईल.