Apple iphone camera secret : अनोखे फीचर्स आणि सुरक्षा उपायांमुळे अ‍ॅपल आयफोन नेहमीच ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, आयफोनचा कॅमेरा हा लोकांना भुरळ घालतो. कॅमेरा गुणवत्तापूर्ण आणि स्पष्ट छायाचित्रे देतो. आयफोनचा उल्लेख झाल्यास अनेक लोक तुम्हाला त्याच्या कॅमेरा क्वालिटीचे कौतुक करताना दिसलेच असतील. पण, या कॅमेराबाबत एक मोठा खुलासा अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी केला आहे.

आयफोनचे कॅमेरा सेन्सर अ‍ॅपल बनवत नाही. मग ते कोण बनवते, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी दिले आहे. सोनी ही कंपनी आयफोनसाठी कॅमेरा सेन्सर बनवते, असा खुलासा कूक यांनी केला आहे.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
sonu nigam met a child fan beatboxing
Video : छोट्या चाहत्यासाठी रस्त्यात थांबला सोनू निगम, टॅलेंटचं कौतुक केलं अन्…; त्याच्या ‘या’ कृतीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

(लॅपटॉपवरूनही करू शकता WHATSAPP VIDEO CALL, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

जपान दौऱ्यावर गेलेल्या टीम कूक यांनी या आठवड्याच्या सुरुवातील ट्विट करून आयफोनच्या कॅमेऱ्याबाबत माहिती दिली. आयफोनसाठी जगातील आघाडीचे कॅमेरा सेन्सर्स तयार करण्यासाठी आम्ही एक दशकाहून अधिक काळ सोनीसह भागीदारी करत आहोत. कुमामोटो येथे कटिंग एज फॅसिलिटी दाखवण्यासाठी केन आणि संघातील सर्वांचे धन्यवाद, असे ट्विट अ‍ॅपलचे सीईओ यांनी केले आहे.

आयफोन सिरीजमध्ये विकसित करण्यासाठी कोणते हार्डवेअर कम्पोनेंट्स वापरले जातात याबाबत अ‍ॅपल गप्प असते. दरम्यान या ट्विटमुळे अ‍ॅपल कॅमेरासाठी सोनीचे सेन्सर्स वापरते ही बाब जगासमोर स्पष्ट झाली आहे.

(वेगवान इंटरनेटचा आनंद घ्या! ‘APPLE IPHONE’वर JIO 5G किंवा AIRTEL 5G वापरण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

आयफोन युजर्ससाठी iOS 16.2 update उपलब्ध

अ‍ॅपलने पात्र आयफोन युजर्ससाठी iOS 16.2 update उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या आयफोनवर ५ जी वापरता येणार आहे. देशात ५ जी सेवा सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. मात्र, काही मोजक्याच स्मार्टफोन्समध्ये ही सुविधा सुरू होती. अ‍ॅपलचे नवीन आणि काही जुन्या सिरीजचे फोन्स ५ जी सपोर्ट करतात, मात्र अपडेटमुळे युजर्सना ५ जी सेवेचा लाभ घेता आला नाही. आता मात्र, अपडेट उपलब्ध होत असल्याने आयफोन युजरला देखील वेगवान इंटरनेटचा वापर करता येणार आहे.