Avoid sudden fair hike of cab : ओला, उबेर आणि इतर टॅक्सी सेवांमुळे दिवसा, रात्री प्रवास करणे सोयिस्कर आणि सुरक्षित झाले आहे. कधी कधी त्यांचे भाडे हे रेग्युलर टॅक्सीपेक्षा कमी असते, त्यामुळे बचत होते. अ‍ॅपद्वारे या टॅक्सी बोलवता येत असल्याने तिला रस्त्यावर हुडकण्याची गरज पडत नाही. अडचणीत फोनद्वारे तुम्ही दिलेल्या लोकशनवर ती येऊ शकते. त्याचबरोबर, या टॅक्सी वेळ आणि अंतरानुसार भाडे आकारत असल्याने कधीकधी रेग्युलर टॅक्सीपेक्षा त्यांचे भाडे कमी निघते, ज्यामुळे बचतही होते. मात्र या अ‍ॅप्समध्ये दाखवण्यात आलेले भाडे नेहमी सारखे नसते. सर्ज प्राइसिंगमुळे भाड्यात अनेकदा चढ उतार होताना दिसून येते.

ओला आणि उबेरद्वारे सर्ज प्राइसिंग ही प्रक्रिया फॉलो केली जाते. या कंपन्यांचे अ‍ॅप एका विशिष्ट भागात जास्त मागणी असताना प्रवास भाड्यात वाढ दर्शवतात. उदहारण ५० रुपयांच्या प्रवासाची किंमत गर्दीच्या वेळी १५० रुपये होऊ शकते. जेव्हा एका भागात वाहन चालकांच्या तुलनेत प्रवाशी अधिक असतात, तेव्हा असे होते. भाडेवाढीमुळे अधिक चालकांना व्यस्त भागात सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
maharashtra assembly election 2024 prakash ambedkar alleges that travel in mumbai and electricity bills is expensive because of adani
मुंबईतली प्रवास, वीज अदानींमुळे महाग, वंचित’च्या प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

(‘IPHONE 15 ULTRA’च्या किंमतीबाबत नवा लिक, तुमच्या बजेटमध्ये बसतो का? जाणून घ्या)

सर्ज प्राइसशिवाय प्रवाशांची संख्या चालकांपेक्षा अधिक असते तेव्हा प्रवाशास अधिक काळ ताटकाळत राहावे लागते. व्यस्त भागात रिक्वेस्ट असेप्ट करण्यासाठी ड्राइव्हरकडे कमी इनसेंटिव्ह असेल. सर्ज प्राइसिंग नेटवर्कमध्ये समतोल राखण्यात मदत करते, असे उबेरचे याबाबत म्हणणे आहे. म्हणून ओला, उबेरच्या युजर्सना टॅक्सीच्या भाड्यात वाढ दिसून येते. सेवेत समतोल राखण्यासाठी असे होत असले तरी ग्राहकांना ते परवडत नाही. अशात घाई नसल्यास तुम्ही वाढलेली भाडेवाड टाळू शकता.

कॅबचे वाढलेले भाडे कसे टाळाल? जाणून घ्या

१) पीक टाईममध्ये कॅब बुक करणे टाळा

कॅबची मागणी वाढल्यास किंमती वाढतात. परंतु, मागणीत दिवसभर वाढ नसते. अशात पीक हवर्सपूर्वी किंवा नंतर टॅक्सी बुक केल्यास फायद्याचे ठरू शकते.

२) पिकअप पॉइंटपासून थोंडे लांबून बूक करा

तुमच्या भागात तुम्हाला भाड्यात वाढ दिसून आल्यास त्या भागापासून थोड्या दूर अंतरावर जा. यामुळे भाडे वाढ कमी झाल्याचे तुम्हाला दिसू शकते. कधीकधी एका ठिकाणाहून अनेक लोक कॅब बुक करतात, त्यामुळे भाडेवाढ होऊ शकते. त्यामुळे व्यस्त ठिकाणापासून थोडे दूर जाऊन कॅब बूक करा.

(गेम खेळताना मोबाईलमध्ये स्फोट, तुम्ही ‘या’ चुका करत असाल तर वेळीच टाळा, अन्यथा महागात पडेल)

३) इतर अ‍ॅप्सवर किंमतींची तुलना करा

कॅब बुक करताना तुम्हाला ठरल्यापेक्षा अधिक भाडे दिसून आल्यास त्याची तुलना इतर सेवेशी करा. ओलाचे भाडे अधिक दिसून आल्यास तुम्ही त्याची तुलना उबेरशी करून पाहा किंवा इतर सेवेशी करा. तुम्ही टॅक्सी क्षेत्रात नवीन असलेल्या कंपनीची सेवा सुद्धा घेऊ शकता. नवीन असल्याने त्यांची मागणी प्रस्थापित कंपन्यांपेक्षा कमी असते आणि त्यांचे चालक पीक हवर्समध्ये तुम्हाला सेवा देऊ शकतात. याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

४) राइड आधिच बूक करा

अ‍ॅपमध्ये शेड्युलचे फीचर असल्यास त्याद्वारे राइड आधीच बुक करून ठेवा. याने शेड्युल करताना जी किंमत होती तीच राहील, त्यात बदल होणार नाही आणि तुम्ही दिलेल्या वेळेत ती तुमच्यासाठी उपलब्ध होईल. अशा प्रकारे वरील काही उपायांनी तुम्ही कॅबचे भाडे देताना बचत करू शकता.