Tips To Download Instagram Reels : अनोख्या, भन्नाट आणि विविध विषयांवरील व्हिडिओंमुळे इन्स्टाग्राम लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तो इन्स्टाग्राम अॅपमध्ये सेव करू शकता. मात्र, त्यास डाऊनलोड करण्याचा पर्याय नाही. परंतु, ते डाऊनलोड होऊ शकत नाही, असे नाही. तुम्ही थर्ड पार्टी अॅप्लिकेशनद्वारे आपले आवडते व्हिडिओ डाऊनलोड करू शकता. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
इन्स्टाग्राम रिल्स आणि व्हिडिओ असे सेव्ह करा
- स्मार्टफोनवर इन्स्टाग्राम सुरू करा आणि रिल्समध्ये जा.
- तुम्हाला हवी असलेली रिल निवडा.
- थ्री डॉट आयकॉनवर टॅप करा आणि ‘सेव्ह’वर क्लिक करा.
- रिल सेव्ह होईल. सेव्ह झालेली रिल तपासण्यासाठी तुम्हाला इन्स्टाग्राम होम स्क्रीनवर जावे लागेल.
- आता ‘प्रोफाइल’ आयकनवर टॅप करा आणि ‘थ्री लाईन’ आयकनवर क्लिक करा.
- सेटिंग्समध्ये जा आणि अकाउंटवर क्लिक करा. सेव्ह केलेले इन्स्टाग्राम रिल्स पाहण्यासाठी ‘सेव्ह’वर टॅप करा.
थर्ड पार्टी टूलद्वारे इन्स्टग्राम रिल्स, व्हिडिओ असे डाऊनलोड करा
- तुम्ही आयग्राम, इनग्रामर, क्लिपबॉक्स आणि ओबीएस स्टुडिओ या अॅप्सद्वारे इन्स्टाग्राम रिल्स किंवा व्हिडिओ डाऊनलोड करू शकता. आयग्रामद्वारे असे करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- http://igram.io/ संकेतस्थळावर जा.
- आता इन्स्टाग्राम रिल्स, व्हिडिओची लिंक कॉपी करा आणि तिला सर्च बॉक्समध्ये पेस्ट करा.
- आता डाऊनलोड पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला खाली स्क्रॉल करून Download.mp4 हा पर्याय निवडावा लागेल.
- आता रिल व्हिडिओ डाऊनलोड होईल आणि तुम्ही तो ऑफलाइन पाहू शकता.
First published on: 26-12-2022 at 20:29 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to download instagram reels and videos for offline viewing ssb