Tips to record whatsapp call : व्हॉट्सअ‍ॅप हा आता दैनंदिन जिवणाचा भागच झाला आहे. मेसेजिंग, व्हिडिओ कॉलिंगसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपचे कॉलिंग फीचर वापरताना कॉल रेकॉर्ड कसा करावा? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कॉल रेकॉर्ड करण्याचे फीचर उपलब्ध नाही. मात्र, अँड्रॉइड आणि आयओएसवर थर्ड पार्टी अ‍ॅपच्य मदतीने कॉल रेकॉर्डिंग करता येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

  • गुगल प्ले स्टोअरवरून call recorder cube acr डाऊनलोड करा.
  • call recorder cube acr ओपन केल्यानंतर त्याने मागितलेल्या परवानग्या द्या.
  • असे केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप कॉल रिसिव्ह किंवा डायल करण्याच्या स्थितीत तुम्हाला त्याचे विजगेट दिसून येईल. विजगेट ने दिसल्यास force voip call as a voice call हे पर्याय निवडा.
  • अ‍ॅप आपोआप कॉल रेकॉर्ड करेल आणि रेकॉर्ड केलेले ऑडिओ तुमच्या फोनच्या इंटरनल स्टोअरेजमध्ये सेव होईल.

(लाँच झाला बजेट फ्रेंडली Nokia C31, ५०५० एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅमसह मिळतात ‘ही’ फीचर्स)

आयफोन युजर्स करा हा उपाय

  • मॅक डिव्हाइसमध्ये क्विक टाइम अ‍ॅप डाऊनलोड करा. यानंतर आयफोनला मॅकशी कनेक्ट करा आणि क्विक टाइम अ‍ॅप्लिकेशन सुरू करा.
  • येथे ‘फाइल’ ऑप्शनमध्ये गेल्यानंतर ‘न्यू ऑडिओ रेकॉर्डिंग’वर क्लिक करा.
  • आयफोन सिलेक्ट केल्यानंतर ‘क्विक टाइम’मध्ये देण्यात आलेल्या ‘रेकॉर्ड’ बटनवर क्लिक करा.
  • यानंतर फोनच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकता आणि त्याची रेकॉर्डिंग आपोआप मॅकमध्ये सेव्ह होईल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to easily record whatsapp call on android and apple phones ssb
Show comments