व्हॉट्सअ‍ॅप वेबद्वारे लॅपटॉप आणि संगणकावर देखील चॅट आणि फाइल शेअरींग करता येते. कार्यालयीन कामासाठी व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर फार फायदेशीर ठरते. लॅपटॉपवर काम करत असताना तुम्ही कार्यालयातील अनेक सहकाऱ्यांशी संपर्कात राहू शकता. वेळेत माहितीची देवाणघेवाण करता येते. मात्र, अनेकदा या फीचरमध्ये समस्या येऊन ते काम करत नसल्याचे तुम्हाला दिसून आले असेल. पुढील टीप्स फॉलो करून व्हॉट्सअ‍ॅपच्या या समस्येपासून सुटका मिळू शकते.

१) डिव्हाइसचे कॅशे आणि कुकीज डिलिट करा

Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
do you know advantage of pressing red button in pune
पीएमटी बसमधील या लाल बटणाचा काय उपयोग आहे? VIDEO होतोय व्हायरल
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Dog Viral Video
‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्
, दिवाळी साफसफाई
“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच

काही वेळा कालबाह्य कॅशे आणि कुकीमुळे व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये त्रुटी येऊ शकतात. अशावेळी तुम्ही ब्राऊजरचे कॅशे आणि कुकीज क्लिअर केले पाहिजे. गुगल क्रोमवर ते क्लिअर करण्यासाठी क्रोममध्ये वर उजव्या भागात असलेल्या ३ डॉट्सवर क्लिक करा. येथे हिंस्ट्रीमध्ये क्लिअर ब्राऊजिंग हिस्ट्रीवर क्लिक करून कॅशे आणि कुकीज क्लिअर करा. ctrl + h दाबून तुम्ही थेट हिस्ट्री उघडू शकता. त्यानंतर तुम्ही गुगल क्रोम परत सुरू करून व्हॉट्सअ‍ॅप वेब सुरू करून पाहा.

(मोटोरोलाच्या ‘या’ फोनवर १५ हजारांची सूट; २०० एमपी कॅमेरा, फास्ट चार्जिंगसह मिळतंय बरच काही)

२) इंटरनेट ब्राऊजर अपडेट करा

इंटरनेट ब्राऊजर अपडेट नसणे हे देखील व्हॉट्सअ‍ॅप वेब काम करत नसल्याचे कारण असू शकते. म्हणून ब्राऊजरचे नवे व्हर्जन अपडेट करा. तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर स्क्रिनवर उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री डॉट्सवर क्लिक करून सेटिंगमध्ये जा. येथे अबाऊट क्रोमवर क्लिक करा. तुमचे ब्राऊजर अपडेटेड नसल्यास गुगल क्रोम आपोआप अपडेट सुरू करेल.

३) व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व्हर्स सुरू आहेत की नाही ते तपासा

व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व्हर्स सुरू आहेत की नाही हे तपासण्यासाठी Downdetector.com या संकेतस्थळावर जा. जर व्हॉट्सअ‍ॅप बंद असेल तर सेवा पुन्हा सुरू होईपर्यंत थांबा. सेवा सुरू झाल्यावर व्हॉट्सअ‍ॅप वेब आपोआप सुरू होईल.