Whatsapp video call on laptop : अलीकडे व्हॉट्सअ‍ॅपने ग्राहकांसाठी अनेक फीचर्स लाँच केले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुपमधील सदस्या संख्या वाढवली असून व्हिडिओ कॉलिंगमध्ये सदस्य संख्या देखील वाढवली आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ३२ सदस्यांसह ग्रुप कॉलिंग करता येते. यासाठी केवळ चांगल्या इंटरनेट कनेक्शनची गरज असते. फोनवर व्हिडिओ कॉलिंग कसे करावे हे अनेकांना माहिती आहे. मात्र संगणक किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल कसा करावा, याबाबत अनेक युजर्समध्ये गोंधळाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप वेबवर व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग फीचर कसे वापरावे, याबाबत जाणून घेऊया.

१. डेस्कटॉपवरून कॉलिंग कसे करावे?

Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Thoda Tuza Ani Thoda Maza fame Sameer Paranjape propose to Shivani surve on aata hou de dhingana season 3
Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
tula shikvin changalach dhada akshara life in danger
अक्षराचा जीव धोक्यात; पत्नीला कसा वाचवणार अधिपती? फोनवर किंचाळण्याचा आवाज येताच घडतं असं काही…; पाहा प्रोमो
article about journey of author subodh kulkarni as a content writer
चौकट मोडताना : ‘कंटेन्ट रायटर’पर्यंतचा मुलाचा प्रवास
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”

व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप कॉलिंग फीचर हे केवळ व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपद्वारे उपलब्ध आहे. हे अ‍ॅप पुढील ऑपरेटिंग सिस्टिम्सना सपोर्ट करते.

  • मॅक ओएस एक्स १०.१० आणि त्यापेक्षा अधिक
  • विंडोज १० आणि त्यापेक्षा अधिक (६४ बिट) आणि विंडोज १० आणि त्यापेक्षा अधिक (३२ बिट)

(Flipkart Big Saving Days निमित्त सुवर्णसंधी, POCO च्या 5G फोन्सच्या किंमतीत मोठी घट, पाहा यादी)

मोफत व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट स्टोअर किंवा मॅक अ‍ॅप स्टोअरवरून व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप इन्स्टॉल करा. त्याचबरोबर, व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉपवर कॉल लावण्यासाठी किंवा रिसिव्ह करण्यासाठी तुम्हाला ऑडिओ आऊटपूट डिव्हाइस आणि एक मायक्रफोन संगणकाला जोडावा लागेल. तसेच संगणकाचा मायक्रोफोन किंवा कॅमेरा वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी द्यावी लागेल.

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर असे करा व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉल

  • ज्याला कॉल करायचे आहे त्याचे चॅट उघडा.
  • व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस आयकनवर क्लिक करा.
  • कॉल दरम्यान तुम्ही मायक्रोफोन आयकनवर क्लिक करून मायक्रोफोन म्युट किंवा अनम्युट करू शकता किंवा कॅमेरा आयकनवर क्लिक करून कॅमेरा सुरू किंवा बंद करू शकता.

(खुशखबर! ‘IPHONE’मध्ये 5G सुरू करणारा अपडेट जारी, ‘हे’ फोन्स करतील सपोर्ट)

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स दरम्यान कसे स्विच व्हावे?

व्हॉइस कॉल दरम्यान तुम्ही ज्याच्याशी बोलत आहात त्यास व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी विनंती करू शकता. कॉल दरम्यान कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा. ज्याच्याशी तुम्ही बोलत आहात त्याने स्विच रिक्वेस्ट स्वीकारल्यास व्हॉइस कॉल व्हिडिओ कॉलमध्ये बदलेल.