व्हॉट्सॅप हे दैनंदिन जीवनातील महत्वाचे घटक झालेले आहे. मेसेज पाठवणे, माहिती देणे, तसेच ग्रुपद्वारे ऑफिसमधील सहकाऱ्यांशी किंवा मित्र मैत्रिणींशी संपर्कात राहण्याचा पर्याय त्याद्वारे मिळते. त्यामुळे त्याचे मुल्य हे नागरिकांसाठी तरी अनन्यसाधारण असे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या काही चुकांमुळे तुमेचे वॉट्सअ‍ॅप खाते हे बंद होऊ शकते. आपल्या खात्याचा वापर तुम्ही स्पॅम किंवा दुसऱ्यांची सुरक्षा धेक्यात आणण्यासाठी केला तर तुमचे वॉट्सअ‍ॅप खाते बंद केले जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉट्सअ‍ॅपच्या मासिक युजर सुरक्षा अहवालानुसार, एकट्या ऑगस्ट महिन्यात वॉट्सअ‍ॅपने २.३ दशलक्ष भारतीय युजरवर बंदी घातली आहे. संपर्कातील लोकांना असत्यापित माहिती किंवा स्पॅम मेसेज केल्यास तुमचेही वॉट्सअ‍ॅप खाते बंद होण्याची पुरेपूर शक्यता आहे. जरी तुम्ही चांगल्या हेतूने वॉट्सअ‍ॅपचा वापर केला असला तरी तुमच्या कृतीने जर कंपनीच्या सेवा, अटी कराराचे उल्लंघन झाले तरी तुमचे खाते बॅन होऊ शकते.
चुकीच्या कार्यात गुंतलेल्या युजरला प्रतिबंध घालण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अनेक सुरक्षा उपाय आणि प्रक्रिया वापरते, जे अशा कार्यात गुतलेल्या व्यक्तींवर स्वयंचलितपणे कारवाई करते. म्हणून तुमचे खाते बंद होऊ नये यासाठी पुढील गोष्टी करणे टाळा.

(लाँच होताच GOOGLE PIXEL 7 PRO मध्ये आढळली ‘ही’ मोठी समस्या, घ्यायचे की नाही? अहवाल वाचूनच ठरवा)

१) दुसऱ्याला मेसेज पाठवण्यापूर्वी विचार करा

मेसेजेस अनेकवेळा कधी पाठवण्यात आले हे युजरला सांगण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप जवळ उपाय आहे. तसेच, मेसेज फॉरवर्ड करण्यावर देखील मर्यादा घालण्यात आली आहे. जर तुम्हाला आलेला मेसेज खरा आहे, किंवा त्याचे स्रोत तुम्हाला माहिती नसेल तर असे मेसेज फॉरवर्ड करू नका. जर मेसेजवर ‘फॉरवर्डेड मेनी टाईम्स’ असा टॅग असेल तर ते तुमच्या ग्रुपमध्ये देखील टाकने टाळावे, कारण तुमच्या कृतीतून तुम्ही देखील स्पॅमिंग करत आहेत, असे समजले जाऊ शकते.

२) मोट्या प्रमाणात संदेश पाठवणे टाळा

गरज नसलेले ऑटोमॅटिक मेसेजेस पाठवण्याऱ्या युजरला बॅन करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप युजरचे संयोजित अहवाल आणि मशीन लर्निंगचा वापर करते. म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवणे, ऑटो मेसेज किंवा ऑटो डायल वापरणे टाळा.

३) ब्रॉडकास्ट यादीचा गरजेपेक्षा अधिक वापर करू नका

ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये एकाचवेळी अनेक लोकांना मेसेज पाठवता येते. जर युजरने तुमचा नंबर सेव्ह केला असेल तर त्याला मेसेज जाईल. परंतु, तुम्ही वारंवार ब्रॉडकास्ट मेसेज वापरत असल्यास अनेक लोक तुमच्या मेसेजची तक्रार करू शकतात. ज्यांच्याविरुद्ध अनेकवेळा अशा प्रकारच्या उल्लंघनाची तक्रार असते, त्यांचे खाते व्हॉट्सअ‍ॅप बंद करते.

(आता लाईनमध्ये लागण्याची गरज नाही, ‘या’ नव्या प्रणालीने सहज मिळेल रेल्वेचे अनारक्षित तिकीट)

४) ग्रुपमध्ये अ‍ॅड करताना परवानगी घ्या

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये व्यक्तीला अ‍ॅड करण्यापूर्वी त्या व्यक्तीची परवानगी घ्या. ग्रुपमध्ये अ‍ॅड केल्यानंतर व्यक्तीने स्वत:हून ग्रुप सोडल्यास त्यांच्या निर्णयाचा आदर करा, त्यांना परत ग्रुपमध्ये टाकू नका. जर कुणी तुम्हाला मेसेज पाठवू नये असे म्हटले तर त्यांना आपल्या कॉन्टॅक्ट यादीतून बाहेर काढा, त्यांना मेसेज करू नका. अशा व्यक्तींना कॉन्टॅक्ट करा ज्यांनी तुमच्याशी संपर्क केला असेल आणि तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क करण्यासाठी परवानगी दिली असेल.

५) व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी आणि शर्थींचे उल्लंघन करू नका

व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवा अटी अवैध, बदनामीकारक, त्रासदायक किंवा खोट्या गोष्टी प्रसिद्ध करण्याच्या श्रेणीमध्ये येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वर्तनांना प्रतिबंधित करतात. त्यामुळे अटी शर्थींचे उल्लंघन करू नका, अन्यथा तुमचे खाते बंद केले जाऊ शकते.

(ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ अ‍ॅप’ला गुगलचा हिरवा कंदील, ट्विटरला देईल आव्हान, काय आहे हे अ‍ॅप? जाणून घ्या)

६) तुमचे खाते चुकून बंद झाले तर?

कुण्या कारणास्तव जर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद झाले आणि ती चूक होती असे तुम्हाला वाटत असेल तर त्यावर उपाय आहे. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपला मेल करा किंवा अ‍ॅपमध्ये रिव्ह्यूसाठी विनंती करा. रिव्ह्यू पर्याय निडवल्यास तुम्हाला ६ अंकी ओटीपी येईल जो तुम्हाला भरावा लागेल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रकरणाला बळ देणाऱ्या माहितीसह विनंती दाखल करू शकता. व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या विनंतीचा विचार करेल, रिव्ह्यू संपल्यावर तुमच्याशी संपर्क साधेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to prevent whatsapp account ban ssb
Show comments