हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीचा केवळ आरोग्यावरच नव्हे तर मोबाइलवरही परिणाम होतो. कडाक्याच्या थंडीने फोनमध्ये बिघाड होऊ शकते आणि तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे थंडीच्या काळात आरोग्यासह मोबाईलची काळजीही घेतली पाहिजे. कडाक्याच्या थंडीमुळे मोबाईलवर काय परिणाम होतो आणि कोणते उपाय करता येईल? याबाबत आज आपण जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिवाळ्यात मोबइलमध्ये उद्भवतात या समस्या

तज्ज्ञांनुसार, ० अंस सेल्सियसपर्यंत फोन चांगला काम करतो, मात्र जेव्हा तापमान माइनसवर पोहोचते तेव्हा स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होते. तापमान जसजसे कमी होत जाते, तसतसे स्मार्टफोनची बॅटरीही उतरत जाते. तज्ज्ञांनुसार बहुतांश फोन्समध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो. तापमान कमी झाल्यावर या बॅटरींचा आंतरिक इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स वाढतो. याने बॅटरीची क्षमता कमी होत जाते.

(भन्नाट दिसतो VIVO X 90, लाँच पूर्वी टीझर जारी, जाणून घ्या फीचर्स)

२) स्क्रीनबाबत समस्या

थंडीत मोबाइलच्या स्क्रिनसंबंधी समस्या निर्माण होतात. तापमान कमी झाल्यावर स्क्रीनवरील मजकूर, चित्रे स्पष्ट दिसत नाही.

३) स्पिकरची समस्या

हिवाळ्यात धुके दिसून येतात. अशा वातावरणात जास्त काळ फोनवर बोल्ल्याने फोनच्या स्पीकरमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. वातावरणातील दवामुळे फोनच्या स्पीकरला नुकसान होऊ शकते.

(FIFA World Cup 2022: फिफाचा आनंद होईल द्विगुणित, फॉलो करा ही अ‍ॅप्स; आवडता खेळाडू, संघ आणि सामन्यांबाबत मिळेल इत्थंभूत माहिती)

थंडीत फोन वापरताना या खबरदारी घ्या

  • आपला फोन थंड वातावरणात अधिक काळ ठेवू नका.
  • फोन ठेवायचे असल्यास त्यास गरम जॅकेटमध्ये ठेवा. यासह तुम्ही फोनला एका चांगल्या कव्हरमध्ये देखील ठेवू शकता. या उपयांनी फोनचे तापमान सामान्य राहील.
  • फोन खिशात ठेवणे उपयुक्त राहील. तुम्ही फोनला चांगला केस लावू शकता.
  • फोनला पुन्हा पुन्हा धुके असलेल्या ठिकाणी नेण्याचे टाळा. असे केल्यास फोनमध्ये ओलावा येईल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to take care of mobile in winter to avoid loss ssb