OnePlus 11 OnePlus 11R India Price : OnePlus 11 5G स्मार्टफोनबाबत मोठी माहिती समोर आली आहे. फोनमध्ये १६ जीबी रॅम मिळू शकते, असे काही अहवालांतून समोर आले होते. आता फोनच्या किंमतीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
वनप्लस ११ ५ जी OnePlus Buds Pro 2 सह ७ फेब्रुवारीला लॉच होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. कंपनीने OnePlus 11 5G स्मार्टफोनचे डिजाईन आणि फीचर्सदेखील टीज करणे सुरू केले आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल आणि हासेलब्लाड कॅमेरा मिळेल. या फोनच्या इतर वैशिष्ट्यांबाबत हळूहळू माहिती पुढे येईल, मात्र त्यापूर्वी या फोनच्या किंमतीबाबत माहिती लिक झाली आहे.
नवीन लिकमध्ये OnePlus 11 5G स्मार्टफोनच्या किंमतीबाबत माहिती सांगण्यात आली आहे. टिप्स्टर योगेश ब्रारनुसार, भारतात फोनची किंमत ५५ हजार ते ६५ हजारांपर्यंत राहू शकते. अपेक्षेपेक्षा महाग आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
(६३ हजारांच्या आत मिळवा महागडा Iphone 14, ‘या’ वेबसाईटवरून करा खरेदी)
वनप्ल ९ ५जी हा २०२१ मध्ये ४९ हजार ९९९ रुपयांमध्ये लॉच झाला होता. तर, वनप्लस १० प्रो हा या वर्षी ६६ हजार ९९९ रुपायंमध्ये लॉच झाला होता. OnePlus 11 5G स्मार्टफोनला प्रो असे नसले, तरी वनप्लसच्या प्रो लाइनअपमध्ये आढळणारी काही वैशिष्ट्ये त्यात मिळणार असल्याचे सांगितल्या जाते. यामध्ये कर्व्ह एजेससह क्यूएचडी प्लस अमोलेड डिस्प्ले, अलर्ट स्लाइडर, डेडिकेटेड टेलिफोटो कॅमेरा यांचा समावेश आह. अफवांनुसार, फोनला वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार नाही.
टिपमधून, OnePlus 11 स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच अमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८ जेन २ एसओसी, ५००० एमएएच बॅटरी आणि १०० वॉट फास्ट चार्जिंग मिळेल, अशी माहिती समोर आली होती. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये ५० मेगापिक्सेल, ४८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, ३२ मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल.
(आवडत्या Stock पुढे ‘हे’ चिन्ह लावा आणि मिळवा संपूर्ण माहिती, गुंतवणूकदारांसाठी ट्विटरचे अनोखे फीचर)
ब्रार यांच्यानुसार, OnePlus 11R स्मार्टफोनदेखील महाग मिळू शकतो. अफवांमध्ये सागण्याते आलेले अपग्रेड, फोनमधील घटकांच्या वाढत्या किंमती पाहता फोनची किंमत अपेक्षेपेक्षा अधिक राहू शकते. ३ ते ५ हजार रुपयांच्या वाढीसह वनप्लस ११ आर हा वनप्लस १० टीची जागा घेईल, असा ब्रार यांचा दावा आहे. नोव्हेंबरपासून OnePlus 11 आणि OnePlus 11R या स्मार्टफोन्सची भारतात चाचणी होत आहे, असे ब्रार यांनी सांगितले.
OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स पूर्वी लीक झाले आहेत. फोनमध्ये ६.७ इंच फूल एचडी अमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८ + जेन १ एसओसी, १६ जीबी रॅम, ५ हजार एमएएच बॅटरी, १०० वॉट सुपर व्हीओओसी चार्चिंग मिळेल, अशी माहिती यापूर्वी लिकमधून उघड झाली आहे.