५ जानेवारीला ‘टायटन आयप्लस’ने (Titan Eye Plus) आपल्या नवीन स्मार्ट ग्लासचा सेट लॉन्च केला. टायटन आयएक्स (Titan EyeX) फिटनेसच्या ट्रेकिंग सिस्टीम सोबतच ओपन एअर स्पिकर्स आणि टच कंट्रोल सुविधेचा सुद्धा समावेश आहे. टायटनचे हे नवीन स्मार्ट ग्लासेस अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) डिव्हाईससोबत सुसंगत असून ब्लूटूथ व्ही५ सोबत कनेक्ट केले जाऊ शकतात. स्मार्ट ग्लासेसचा धूळ आणि पाण्यापासून बचाव करण्यासाठी यामध्ये एक इनबिल्ट ट्रेकर आणि आयपी ५४ रेट बिल्ट देखील देण्यात आला आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर हे ग्लासेस ८ तासांपर्यंतची बॅटरी लाईफ देतात. या स्मार्ट ग्लासेसमध्ये एक क्वालकॉम प्रोसेसर (Qualcomm processor) बसवण्यात आला असून ओपन एअर स्पिकर्स (open-ear speakers) हे व्हॉइस बेस नेव्हिगेशन आणि फिचर व्हॉइस नोटिफिकेशनची सुविधासुद्धा प्रदान करतात.

टायटन आयएक्सचे खास फीचर्स :

वर सांगितल्याप्रमाणे, टायटन आयएक्समध्ये अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथ व्ही५ ची सुविधा आहे. चष्म्यांना दोन्ही ओएससाठी एक अ‍ॅपसुद्धा तयार करण्यात आलं आहे. टायटन आयएक्स एका अज्ञात क्वालकॉम प्रोसेसरद्वारे संचालित आहे. या स्मार्ट ग्लासेसमध्ये ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) क्षमतेसह ओपन-इअर स्पीकर्स आहेत. यामुळे टायटन आयएक्स आऊटडोर वापरासाठी सोपे होते. आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव ठेवूनही वापरकर्ते संगीत ऐकू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!

या ओपन एअर स्पीकर्सद्वारे आवाजावर आधारित नॅव्हिगेशन आणि नोटिफिकेशनची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. यातील क्लिअर व्हॉईस कॅप्चर (CVC) तंत्रज्ञान डायनॅमिक व्हॉल्यूम कंट्रोलसह स्पष्ट आवाज गुणवत्ता प्राप्त करण्यात मदत करते. तसेच आजूबाजूच्या आवाजाशी तुलना करून आवाजाची पातळी आपोपाप नियंत्रित करते.

या स्मार्ट ग्लासेसमध्ये फिटनेस ट्रेकिंगचे फिचर समाविष्ट आहे. इनबिल्ट पेडोमीटरचा वापर करून कॅलरी, पावले आणि अंतर ट्रॅक करण्यात हे मदत करते. टायटन आयएक्स आपल्या वापरकर्त्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांचा स्क्रीन टायमिंग वाढत असल्यास त्यांना सतर्क करते. याशिवाय या स्मार्ट ग्लासमध्ये प्ले, पॉज, स्किप, प्रिव्हेंट यासाठी टच कंट्रोल देखील देण्यात आला आहे.

टायटन आयएक्समध्ये चष्म्याचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी एक इनबिल्ट ट्रॅकर लावण्यात आला आहे. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ८ तासांपर्यंत चालते. या स्मार्ट ग्लासेस जे मोजमाप १२४x१४०x४० मिमी इतके आहे.

भारतातील या स्मार्ट ग्लासेसची किंमत :

५ जानेवारीला लॉन्च झालेल्या या स्मार्ट ग्लासेसच्या फ्रेमची किंमत ९,९९९ रुपये इतकी आहे. तसेच याच्या प्रिस्क्रिप्शन फ्रेमची किंमत ११,१९८ रुपयांपर्यंत जाऊ शकते. १० जानेवारीपासून या स्मार्ट ग्लासेसची शिपिंग सुरु केली जाईल, असे टायटनच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. टाळ्या रंगाच्या फ्रेममध्ये हे स्मार्ट ग्लासेस उपलब्ध असतील. तुम्ही टायटनच्या अधिकृत वेबसाइट किंवा किरकोळ स्टोरमधून सुद्धा हे ग्लासेस खरेदी करू शकता.

Story img Loader