दिवाळीमध्ये अनेक लोक घरी नवीन वस्तू घेतात. तुम्ही देखील फ्रीज, टीव्ही, वॉशिंगमशीन, स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर ते घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमची मोठी बचत होऊ शकते. या वस्तू तुम्हाला स्वस्तात कशा मिळणार याबाबत जाणून घेऊया.
१) ऑनलाईन ऑफर
अलिकडे मोठ्या संख्येने लोक ईकॉमर्स संकेतस्थळांवर वस्तू खरेदी करत आहेत. या संकेतस्थळांवर बाजारभावापेक्षा कमी किंमतीत वस्तू विकल्या जातात. वस्तूंवर मोठी सूट आणि ऑफर देखील दिल्या जाते. याने ग्राहकाची मोठी बचत होते. सध्या अमेझॉन, फ्लिपकार्ट या ईकॉमर्स कंपन्या स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट देत आहेत. या संकेतस्थळांवरून खरेदी केल्यास तुमची मोठी बचत होऊ शकते.
(ईमेल खाते हॅक झाल्यास तातडीने ‘या’ गोष्टी करा, भविष्यात अशा घटनांपासून मिळू शकते सुरक्षा)
२) रिवॉर्ड पॉइंट्स
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बिल कमी करण्यासाठी तुम्ही रिवॉर्ड पॉइंट्सची मदत घेऊ शकता. अनेक बँक ग्राहकांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट देतात. त्यांचा वापर करून तुमची बचत होऊ शकते.
३) कॅशबॅक ऑफर
तुमच्या बँकेच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला कॅशबॅक मिळू शकते. अनेक बँक क्रेडिट कार्डवर ऑफर देतात. दिवाळीवर अनेक बँक आपल्या ग्राहकांना कॅशबॅक ऑफर देतात. त्याचा वापर करून तुम्ही बचत करू शकता.
(‘GOOGLE’ आणि ‘APPLE’ च्या सीईओंनी दिवाळी निमित्त दिलेल्या शुभेच्छांची सर्वत्र चर्चा, ट्विट्सला नेटकऱ्यांची पसंती)
4) रिटेल स्टोअर ऑफर
अनेक रिटेल स्टोअर दिवाळी निमित्त डिस्काउंट ऑफर देतात. याबाबत तुम्ही मोठ्या ब्रांडच्या शोरूममध्ये जाऊन माहिती घेऊ शकता. विजया सेल्सच्या स्टोअरमध्ये तुम्हाला एसी, टीव्ही, फ्रिजवर मोठी सूट मिळू शकते. इतर ब्रांड्स देखील सूट देतात.