ChatGpt : सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते. आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जावे लागत नाही. ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे. आता हेच चॅटजीपीटी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात गेमचेंजर ठरणार आहे.
आता मात्र चॅटजीपीटी वापरण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागणार आहेत. ओपनएआयचे चॅटबॉट हे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सोप्या शब्दात देऊ शकते. या चॅटबॉटचे आव्हान गुगलसमोर आहे. यामुले कंपनीने स्वस्तही यापूर्वीच रेड अलर्ट जाहीर केला होता. चॅटजीपीटी साठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागणार आहेत हे आपण जाणून घेऊयात.
हेही वाचा : लवकरच लाँच होणार ChatGpt ची ‘ही’ सिरीज; जाणून घ्या
जर तुम्हाला चॅट GPT वापरायचे असेल तर आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला ४२ डॉलर म्हणजे ३,४०० रूपये मोजावे लागणार कहते. यामध्ये वेबसाईटवर जास्त ट्राफिक असले तरी लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. तसेच लोकांना याच्या प्रोफेशनल प्लॅनमध्ये अधिक स्पीडमध्ये अनेक अपडेट्स पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा : Whatsapp वर ChatGpt कसे वापराल? जाणून घ्या ‘या’ सोप्या ट्रिक्स
हा चॅटबॉट ओपनएआय ने तयार केले आहे. ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च करणारी कंपनी आहे. चॅटजीपीटी आणि मायक्रोसॉफ्ट एकत्र आले असून याचे कारण म्हणजे गुगलशी स्पर्धा करता यावी. पुढील काही वर्षात चॅटजीपीटी गुगलचा सर्च बिझनेस कमी करू शकतो असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.