देशातील पहिले Apple रिटेल स्टोअर आज मुंबईत सुरु झाले आहे. याचे उद्घाटन सीईओ टीम कुक यांनी केले. मुंबईच्या अॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या जातील. स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात आले आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे केले आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग २० एप्रिल रोजी होणार आहे.
असे म्हटले जात आहे की Apple Store इतर सर्व स्मार्टफोन स्टोअरपेक्षा खूप वेगळे आहे. हे खास भारतीय संस्कृती लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये विविध राज्यांतील कलाकृती पाहता येईल. Apple च्या भारतातील पहिल्या रिटेल स्टोअरविषयी जाणून घेऊयात.
१.
Apple कंपनीला भारतात २५ वर्षे पूर्ण होत आहेत. आणि याच वर्षी कंपनीचे पहिले स्टोअर भारतात सुरु झाले आहे. २५ व्य वर्षी बीकेसी मध्ये रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये हे स्टोअर सुरु करण्यात आले आहे. तर भारतातातील दुसरे स्टोअर दिल्ली येथे २० एप्रिलपासून सुरु होणार आहे.
२.
Apple चे हे नवीन आऊटलेट हे त्याचे भारतीयकारण करण्यासाठीचे कंपनी प्रयत्न दिसून येत आहेत. मुंबईत सुरु झालेले आऊटलेट हे काळ्या आणि पिवळ्या रंगात करण्यात आले आहे. ज्याचा संबंध मुंबईच्या प्रसिद्ध टॅक्सीशी जोडलेला आहे.
३.
स्टोअरच्या छतामध्ये १,००० टाईल्स लावण्यात आल्या आहेत. प्रत्येक टाईल्स ही लाकडाच्या ४०८ तुकड्यांपासून तयार करण्यात आली आहे. ज्यमुळे ३१ मोड्यूल बनतात. हे इतके आकर्षक आहे की, ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच स्टोअरमधील पायऱ्या स्टेनलेस स्टीलच्या असून त्याचे माप १४ मित्र इतके आहे.
४.
Apple Bkc ने स्टोअरसाठी सोलर अॅरेचा वापर केला आहे. ज्यामध्ये जीवाष्म इंधन म्हणजे पेट्रोल-डिझेल अजिबात वापरले जाणार नाही आहे. म्हणजेच स्टोअर पूर्णपणे कारबन न्यूट्रल स्वरूपाचे आहे.
५.
या Apple स्टोअरमध्ये दोन दगडी भिंतीही आहेत. ज्यांचे दगड खास राजस्थानवरून आणले आहेत. हे संपूर्ण स्टोअर २०,००० चौरस फुटांमध्ये पसरलेले आहे. ज्यासाठी कंपनी १५ टक्के वार्षिक वाढीसह ४२ लाख रुपये प्रति महिना भरणार आहे.
६.
Apple Bkc या स्टोअरमध्ये १०० सदस्यांची एक टीम असणार आहे. जे १८ भारतीय भाषा बोलू शकतात. ज्यामुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलणाऱ्या ग्राहकांशी लगेच कनेक्ट होता येईल.
७.
Apple बीकेसी स्टोअरमध्ये भारतीय ग्राहक कंपनीच्या AI सेवा ‘Apple Genius’ शी संवाद साधता येणार आहे. ही सुविधा परदेशात Apple स्टोअरमध्ये ऑफर केलेल्या सुविधांसारखीच आहे. Apple च्या जिनियसमधून ग्राहकांना कंपनीच्या कोणत्याही उत्पादनाची माहिती मिळणार आहे.
८.
Apple बीकेसी मध्ये ग्राहक नवीन आयफोन्स आणि कंपनीची बाकी प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतात. तसेच खरेदीदार त्यांचे जुने आयफोन, मॅक, आयपॅड असे नवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.
९.
Apple च्या म्हणण्यानुसार, हे स्टोअर भारतात रोजगाराला देखील चालना देणार आहे. सध्या Apple भारतामध्ये २,५०० लोकांना रोजगार देत आहे. आता त्यांच्या App इकोसिस्टमद्वारे १० लाख नोकऱ्या निर्माण करण्यास मदत करणार आहे.
१०.
हे स्टोअर व्यावसायिक, निर्माते किंवा Apple कर्मचार्यांनी होस्ट केलेले “Today at Apple” देखील होस्ट करेल. या सत्रात महत्वाची गोष्ट ही आहे की,यामध्ये कलाकार, छायाचित्रकार आणि इतर सर्जनशील व्यावसायिकांच्या कार्यशाळा समाविष्ट केल्या जाणार आहेत.