New Technologies AI Developments 2024 : आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा संगणकाचा एक टूल आहे, जो इंटेलिजंट मशीन्सच्या विकासावर भर देतो. या इंटेलिजंट मशीन्स मानवांप्रमाणे विचार करतात आणि कार्य करतात. आता एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहे आणि येथून पुढे एआयचा हस्तक्षेप हा आणखी वाढत जाईल.

आता एआयमध्ये जनरेटिव्ह एआय हे नवीन विकसित टूल आलेले आहे. या जनरेटिव्ह एआयचा वापर करून उद्योगांमध्ये ट्रिलियन डॉलर्सचे मूल्य निर्माण करण्याची क्षमता आहे. जगभरातील लोकांनी त्यांच्या वर्कफ्लोमध्ये जनरेटिव्ह AI समावेश करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे AI ची लोकप्रियता आणखी वाढत आहे. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात एआयमध्ये अनेक मोठे बदल दिसून आले. आज आपण एआयमधील पाच महत्त्वाचे बदल जाणून घेणार आहोत.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Dr Babasaheb Death Anniversary 2024
महामानवाला अभिवादन, दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटला!

निवडक कार्यांमध्ये AI ने माणसाला मागे टाकले

AI ने इमेज क्लासिफिकेशन, व्हिजुअल रिजनिंग आणि इंग्रजी समज यांसारख्या काही क्षेत्रांत माणसाला मागे टाकले आहे. पण, स्पर्धास्तरीय गणित आणि व्हिज्युअल कॉमनसेन्स रिजनिंग यांसारख्या कठीण बाबतीत एआय अजूनही मागे आहे.

हेही वाचा : Top Mobile Launches 2024: आयफोनपासून ते वनप्लसपर्यंत… २०२४ मध्ये ‘हे’ स्मार्टफोन्स ठरले सगळ्यात बेस्ट

एआय संशोधनावर उद्योग क्षेत्राचा वाटा

आता उद्योग क्षेत्राने AI संशोधनात आघाडी घेतली आहे. २०२३ मध्ये शैक्षणिक क्षेत्रातील १५ मॉडेलच्या तुलनेत २०२४ मध्ये ५१ उल्लेखनीय मशीन लर्निंग मॉडेल्सची निर्मिती केली आहे. यावरून AI इनोव्हेशनमध्ये खाजगी कंपन्यांची महत्त्वाची भूमिका दिसून येते.

जनरेटिव्ह AI गुंतवणुकीत वाढ

जनरेटिव्ह AI ने गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. याला टेक इकोसिस्टमचा पाठिंबा आहे. प्रस्थापित कंपन्या आणि स्टार्टअप्सकडून AI च्या क्षमतांमध्ये रुची वाढल्याचे दिसून येत आहे.

सुरक्षित, विश्वासार्ह आणि नैतिक पद्धतीने AI चा वापर

जसजसा AI चा व्याप वाढत आहे, तसतसा त्याच्याबाबतीत चिंता वाढत आहे. संशोधक एआयबाबतीत अधिक पारदर्शकतेवर जोर देऊन AI मॉडेल्सच्या सुरक्षिततेचे आणि त्यापासून होणाऱ्या धोक्याचे मूल्यमापन करत आहे.

हेही वाचा : Year Ender 2024: चर्चा तर होणारच! ‘या’ हटके गॅजेट्सने गाजवले २०२४ वर्ष; पाहा टॉप ५ गॅजेट्स

AI चा आर्थिक प्रभाव

AI चा अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होत आहे. एआयमुळे काही संस्थांनी खर्चात कपात केल्याचा अहवाल दिला आहे तसेच AI च्या अवलंबामुळे महसूल वाढताना दिसत आहे. एआयसंबंधित जॉब पोस्टिंगमध्येदेखील घट झाली आहे, ज्यामुळे नोकरीच्या विश्वात मोठा बदल दिसून आला आहे.

Story img Loader