OnePlus 10T स्मार्टफोन हा २०२२ मधला OnePlus चा दुसरा जागतिक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. यापूर्वी चीनी कंपनीने याटवर्षी वनप्लस 10 प्रो लॉंच केला होता. OnePlus 10T भारतात ४९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. क्वालकॉमचा नवीन स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर या OnePlus स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. हा फोन १५० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. OnePlus 10T मध्ये काय खास आहे? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या OnePlus स्मार्टफोनचे टॉप ५ फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घ्या…
OnePlus 10T स्मार्टफोनमध्ये ग्लास सँडविच डिझाईन देण्यात आले आहे. फोन प्लास्टिक फ्रेमसह मिळतो. कंपनीने हा हँडसेट मूनस्टोन ब्लॅक आणि जेड ग्रीन कलरमध्ये लॉंच केला आहे. मूनस्टोन ब्लॅक कलरमध्ये शिमरी आणि मागील बाजूस सँडस्टोन सारखी फिनिशींग येते. तर जेड ग्रीन कलरमध्ये थोडी चकाकी आहे. कंपनीने या फोनमध्ये अलर्ट स्लाइडर दिलेला नाही. फोनचे वजन सुमारे २०३.५ ग्रॅम आहे आणि त्याची जाडी ८.८ मिलीमीटर आहे. फोन थोडा जड आहे आणि OnePlus 10 Pro पेक्षा जास्त जाडीसह येतो.
आणखी वाचा : Jio च्या प्लॅनमध्ये १०९५ GB पर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि फ्री ऑफर, किंमत ४१९ रुपयांपासून सुरू
OnePlus 10T स्मार्टफोनमध्ये अगदी नवीन Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबत फोनमध्ये ८ GB, १२ GB आणि १६ GB रॅमचा पर्याय आहे. फोनमध्ये २५६ GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, स्मार्टफोनचे स्टोरेज वाढवता येत नाही. यात हायपरबूस्ट गेमिंग इंजिन देण्यात आले आहे, जे फोनमध्ये अधिक चांगला गेमिंग एक्सपिरीयन्स देईल. फोनमध्ये नेक्स्ट जेन ३डी कूलिंग २.० तंत्रज्ञान देखील आहे, जे फोनमध्ये आढळणारी सर्वात मोठी वॅपॉर कूलिंग सिस्टम आहे.
OnePlus 10T मध्ये १०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.७ इंचाचा फ्लॅट डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे आणि तो HDR10+ ला सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्लेवर होल पंच कटआउट आहे. वनप्लसचा हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे प्रोटेक्शन देतं. हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. डिस्प्ले अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि बॅटरी लाइफ वाचवण्यासाठी आणि स्मूथ एक्सपिरियन्स फोन ६० Hz, ९० Hz आणि १२० Hz रिफ्रेश रेटवर सेट करता येऊ शकतं.
आणखी वाचा : ६ तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देणारा Mivi Fort S16, S24 साउंडबार भारतात लॉंच, किंमत १,२९९ रूपयांपासून सुरू
OnePlus चा हा स्मार्टफोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 सह येतो. OxygenOS 13 यावर्षी उपलब्ध करून दिला जाईल. 10 प्रो प्रमाणे कंपनीने या फोनमध्येही चार वर्षांसाठी तीन प्रमुख OS आणि सिक्यूरिटी अपडेट देण्याचे वचन दिले आहे.
OnePlus 10T ला चार्ज करण्यासाठी ४८०० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी १५० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतं. पहिल्या तीन मिनिटांत फोन ३० टक्के चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये एक दिवसाची बॅटरी लाइफ मिळेल असा दावा करण्यात आला आहे. OnePlus कंपनी असंही म्हणणं आहे की, नवीन चार्जिंग टेक्नॉलॉजी आधीच सुरक्षित आहे आणि १३ टेम्परेचर सेंसर आणि स्मार्ट चार्जिंग अल्गोरिदमसह येते. नवीन बॅटरी इंजिन रिअल टाइममध्ये बॅटरीचं हेल्थ मॉनिटर करते आणि बॅटरीचे कोणतेही नुकसान होण्याचा धोका कमी करते. OnePlus कंपनी ला विश्वास आहे की नवीन टेक्नॉलॉजी बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी मदतीचं ठरेल.
आणखी वाचा : मेडिकल ग्रेड देणारी जगातील पहिली भन्नाट स्मार्टवॉच भारतात लाँच, पाहा काय आहे खास?
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus 10T च्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ५४,९९९ रुपयांना उपलब्ध केले जाईल, तर १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ५९,९९९ रुपयांना उपलब्ध केले जातील.