Best New Gadgets 2024: २०२४ हे वर्ष वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिल आहे. तंत्रज्ञान क्षेत्रासाठीही खूप महत्त्वाचं ठरलं आहे. कारण यावर्षी अनेक नवीन गॅझेट्स लाँच करण्यात आले. काही गॅझेट्स हटके आणि एका नवीन लूकमध्ये लाँच झाले. तर काही गॅझेट्स कमी किंमतीत सर्वाधिक फायदे देणार ठरले. २०२४ मध्ये लाँच झालेल्या अशाच हटके डिव्हाइसबद्दल सविस्त जाणून घेऊयात.

LG ची पारदर्शक टीव्ही

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Best Horror Movies On OTT
२०२४ मधील सर्वोत्तम भयपटांची यादी, सर्वच चित्रपट OTT वर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिलेत का?
Mata Lakshmi's Blessings
२०२५ मध्ये या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा! माता लक्ष्मीच्या कृपेमुळे सुटतील आर्थिक समस्या
Dr Babasaheb Death Anniversary 2024
महामानवाला अभिवादन, दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटला!
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १० दिवसानंतर पालटणार तीन राशींचे नशीब, सूर्य देवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन

टीव्हीच्या विश्वात गेल्या दशकात अनेक मोठे बदल झाले आहेत. सुरुवातीला टीव्ही मोठे आणि जाड होते परंतु आता ह्यांची जाडी कमी होत गेली आणि हे स्लीक होत गेले. सध्या टीव्ही इतके पातळ आहेत की ते भिंतीवर देखील सहज लटकवता येतात. परंतु आता ह्यापुढे टीव्ही टेक्नॉलॉजीमध्ये कोणते बदल होतील माहित आहे का? कधी विचार केला आहे का? पण यावर्षी LG नं पारदर्शक टीव्ही बाजारात आणली.या टीव्हीमध्ये एक अपारदर्शक लेयर असते, जी रिमोटचा वापर करून हटवली जाऊ शकते. जेव्हा ही लेयर हटवली जाते तेव्हा टीव्ही पूर्णपणे पारदर्शक होते. ह्या टीव्हीमध्ये LG चा अल्फा ११ एआय प्रोसेसर देखील आहे, जो पिक्चर क्वॉलिटीची शानदार देतो आणि ब्लॅक आणि ट्रान्सपरंटमध्ये सहज स्विच करण्यास मदत करतो.

ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफोन लॉन्च

आतापर्यंत तुम्ही फोल्ड आणि फ्लिप स्मार्टफोन्स पाहिले असतील जे जास्तीत जास्त दुप्पट फोल्ड करतात. पण चीनी कंपनी हुआईने तीन वेळा फोल्डिंग स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा उघडल्यानंतर हा स्मार्टफोन टॅबलेटसारखा मोठा होतो. यात १०.२ इंचाची मोठी स्क्रीन आहे. एवढेच नाही तर हुआई मेट एक्सटी अल्टीमेट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो खूप शक्तिशाली आहे. Huawei च्या फोल्ड करण्यायोग्य फोनमध्ये १०.२ इंचाची फ्लेक्सिबल LTPO OLED स्क्रीन आहे. जी ३१८४ x २२३२ पिक्सेल रिझोल्यूशनसह सुसज्ज आहे. यात ६.४ इंचाचा सेकंडरी डिस्प्ले आहे. दरम्यान, फोन एकदा फोल्ड केला जाऊ शकतो आणि ७.९ इंच डिस्प्लेमध्ये रूपांतरित केला जाऊ शकतो. फोनमध्ये १६GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे.

सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन

ऑनरने आपला लेटेस्ट फोल्डेबल फोन ऑनर मॅजिक व्ही ३ २०२४ मध्ये लॉन्च केला.जगातील सर्वात पातळ आणि हलका फोल्डेबल स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये अनेक उत्कृष्ट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.सॅमसंगचा लोकप्रिय फोल्डेबल फोन गॅलेक्सी झेड फोल्ड ६ पेक्षा हा फोन पातळ आहे. गॅलेक्सी झेड फोल्ड ६ ची जाडी १२.१ मिमी आहे. परंतु, मॅजिक व्ही ३ ची जाडी फक्त ९.२ मिमी आहे, ऑनरचा हा फोन सॅमसंगपेक्षा सुमारे ३ मिमी पातळ आहे, जी फ्लॅगशिप फोनसाठी मोठी गोष्ट आहे. ऑनरच्या नव्या फोल्डेबल फोनचे वजनही केवळ २२६ ग्रॅम आहे.

Orion स्मार्ट ग्लास

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ओरियन हा आतापर्यंतचा सर्वात प्रगत स्मार्ट चष्मा लाँच केला आहे. ओरियन हा जगातील आतापर्यंतचा सर्वात प्रगत स्मार्ट ग्लास असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याला कोणत्याही तारा जोडलेल्या नाहीत आणि त्याचे वजन 100gm पेक्षा कमी आहे. ओरियन सामान्य चष्मासारखा दिसतो आणि त्यात होलोग्राफिक डिस्प्ले आहे. प्रथमच, कंपनीने पूर्ण होलोग्राफिक ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) चष्मा लाँच केला आहे. ओरियन चष्मा आवाजाद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे इंटिग्रेशन देण्यात आले आहे.

हेही वाचा >> Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट

Casio रिंग साइज वॉच

लोकप्रिय डिजिटल घड्याळ निर्मिती कंपनी Casio ने पहिले रिंग आकाराचे घड्याळ लाँच केले. विशेष गोष्ट अशी आहे की या रिंगमध्ये अर्ध-कॅसिओ डिझाइन आहे आणि एक छोटा स्क्रीन देखील आहे जो वेळ दर्शवितो. एक इंच पेक्षा कमी आकारमान असूनही, नवीन रिंग वॉचमध्ये सात-सेगमेंटची एलसीडी स्क्रीन आहे जी तास, मिनिटे आणि सेकंद प्रदर्शित करू शकते. तीन फिजिकल बटणे देखील आहेत जी तुम्हाला वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये तारीख किंवा वेळ प्रदर्शित करू देतात आणि स्टॉपवॉच वैशिष्ट्यात प्रवेश करू शकतात. रिंग वॉचमध्ये स्टेनलेस स्टीलच्या बेझलसह एक लहान केस देखील आहे. स्क्रीनमध्ये प्रकाश स्रोत आहे, ज्याचा वापर अंधारात वेळ पाहण्यासाठी केला जाऊ शकतो.

Story img Loader