Tarrif Plan Prices Reduced: युजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Jio, Airtel, VI आणि BSNL ने कॉलिंग + SMS आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किमती कमी केल्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, काही दिवसांपूर्वी TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना कॉलिंग + SMS फक्त टॅरिफ प्लॅन लाँच करण्याचे आदेश दिले होते. जेणेकरून ज्या लोकांना डेटाची गरज नाही त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच, TRAI ने भारतातील सर्व प्रमुख दूरसंचार ऑपरेटर्सना, जिओ, एअरटेल आणि विआयला आवाहन केले की, व्हॉईस आणि एसएमएस-फक्त रिचार्ज योजना आणा. ज्या वापरकर्त्यांना फक्त व्हॉइस आणि एसएमएस सेवांची गरज आहे परंतु स्वतंत्र ऑफरच्या कमतरतेमुळे त्यांन गरज नसताना इतर प्लॅन खरेदी करण्यास भाग पडते. अशा वापरकर्त्यांसाठी परवडणारे पर्याय उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रतिसाद म्हणून, Jio, Airtel आणि Vi ने त्यांचे नवीन रिचार्ज पॅकेज सादर केले.

जिओने कमी केल्या किमती

जिओचा प्रीपेड प्लॅन आता ४५८ रुपयांऐवजी ४४८ रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 1000 एसएमएस उपलब्ध आहेत. त्याच वेळी, जिओचा एक वर्ष व्हॅलिडिटी प्लॅन आता १९५९ रुपयांऐवजी १७४८ रुपयांचा झाला आहे. या प्लॅनमध्ये ३६०० एसएमएस उपलब्ध आहेत.

एअरटेलच्या प्लॅनचीही किंमत झाली कमी

८४ दिवसांच्या वैधतेसह एअरटेलच्या कॉलिंग-एसएमएस केवळ प्रीपेड प्लॅनची ​​किंमत यापूर्वी ४९९ रुपये होती. जे कंपनीने अपडेट केले आणि सादर केले. मात्र, ट्रायच्या कारवाईनंतर त्याची किंमत ४६९ रुपये करण्यात आली. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० एसएमएस उपलब्ध आहेत. एअरटेलचा १९५९ रुपयांचा प्लॅन १८४९ रुपयांचा झाला आहे. त्याची वैधता एक वर्ष आहे. प्लॅनमध्ये ३६०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.

VI आणि BSNL

Vi- ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि ९०० एसएमएस ४७० रुपयांमध्ये
१८४९ रुपयांमध्ये ३६०० एसएमएस आणि ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा
BSNL- ३०० एसएमएस आणि 99 रुपयांमध्ये १७ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग
४३९ रुपयांमध्ये ९० दिवसांसाठी ३०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trai intervention jio airtel vi launch revised voice only recharge plans srk