फोन जुना झाला की आपण नवीन फोन घेतो. मात्र, जुन्या फोनमध्ये काही महत्वाचा डेटा असतो. हा डेटा जुन्या फोनमधून नव्या फोनमध्ये पाठवायला फार वेळ लागत नाही. मात्र, व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॅकअप, मीडिया आणि हिस्ट्री नव्या फोनमध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया फार मोठी आहे. जर तुम्हाला नव्या फोनमध्ये चाट हिस्ट्रीसह व्हॉट्सअ‍ॅप डेटा हस्तांतरित करायचा असेल तर तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करून नव्या फोनमध्ये डेटा हस्तांतरित करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) अँड्रॉइड ते अँड्रॉइड

  • जुन्या अँड्रॉइड फोनमधून नव्या अँड्रॉइड फोनमध्ये डेटा हस्तांतरित करण्यापूर्वी जुन्या फोनमधील सर्व व्हॉट्सअ‍ॅप डेटाचा गुगल ड्राइव्हमध्ये बॅकअप घ्या.
  • यासाठी आधी व्हॉट्सअ‍ॅप उघडा, नंतर ‘मोर’ ऑप्शनमध्ये जा, नंतर सेटिंग्स, चॅट आणि नंतर चॅट बॅकअपवर टॅप करा.
  • ज्या गुगल खात्यावर तुम्हाला बॅकअप घ्यायचे आहे, ते खाते निवडा.
  • त्यानंतर नवीन अँड्रॉइड फोन तुम्ही ज्या गुगल खात्यावर बॅकअप घेतले आहे त्याच्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा.
  • नव्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल करा आणि ‘साइन इन’ करा.
  • ‘रिस्टोअर युअर चॅट फ्रॉम गुगल ड्राइव्ह’ असे विचारल्यास ‘रिस्टोअरवर’ टॅप करा.
  • रिस्टोअरेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘नेक्स्ट’वर क्लिक करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या जुन्या मोबाईलमधील चॅट्स नव्या मोबाइलमध्ये दिसून येतील.
  • चॅट्स रिस्टोअर झाल्यावर व्हॉट्सअ‍ॅप मीडिया फाइल्स रिस्टोअर करणे सुरू ठेवेल.

(सावधान! ट्विटरवर ‘ही’ चूक करू नका, खाते तर बंद होईलच, ब्ल्यू टीकही गमवाल)

२) अँड्रॉइड ते आयओअएस

  • चॅट आयओएस असलेल्या फोनमध्ये हस्तांतरित करण्यासाठी ‘मुव्ह टू आयओएस’ हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून अँड्रॉइड फोनमध्ये डाऊनलोड करा.
  • डॉऊनलोड झाल्यानंतर हे अ‍ॅप सुरू करा आणि स्क्रिन वर दिलेल्या निर्देशांना फॉलो करा.
  • सूचित केल्यावर आयफोनवर प्रदिर्शित केलेले कोड अँड्रॉइड फोनमध्ये प्रविष्ट करा.
  • त्यानंतर ट्रान्स्फर डेटा स्क्रिनवर व्हॉट्सअ‍ॅप सिलेक्ट करा आणि स्टार्टवर टॅप करा. नव्या फोनमध्ये डेटा हस्तांतरित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप डेटा तयार करेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर साईन आऊट करा.
  • त्यानंतर डेटा हस्तांतरित करण्यासाठी परत मुव्ह टू आयओएसमध्ये जाऊन कंटिन्यूवर टॅप करा.
  • डेटा ट्रान्सफर पूर्ण झाल्यावर नवीन आयफोनवर नवीन व्हॉट्सअ‍ॅप अपडेट इन्स्टॉल करा.
  • पूर्वीच्या मोबाईल क्रमांकाने लॉगइन करून स्टार्टवर टॅप करा.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या नव्या आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स दिसून येतील.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tranfer whatsapp chat to news mobile with this tips ssb