आजकाल बऱ्यापैकी लोक त्यांना लागणाऱ्या अनेक वस्तू ऑनलाइन शॉपिंग करतात, यासाठी कधी ते अॅडव्हान्स पेमेंट करतात तर कधी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यार स्विकारतात. पण वर्जीनियातील एका महिलेबरोबर असे काही घडले जे वाचल्यानंतर तुम्हीदेखील थक्क व्हाल यात शंका नाही. हो कारण येथील एका महिलेला ऑर्डर न करता अचानक अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवरून अनेक पार्सल मिळाल्याची घटना उघडकीस आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शंभरहून अधिक पार्सल मिळाले –

आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलेने कोणत्याही वस्तूची ऑर्डर दिली नव्हती तरीही तिच्या घरी आलेल्या पॅकेजची संख्या १०० पेक्षा जास्त होती. वर्जीनियातील सिंडी स्मिथने सांगितले की, पॅकेज नुकतेच तिच्या प्रिन्स विल्यम काउंटी येथील घरच्या पत्त्यावर येत होती. या पार्सलमध्ये तिला सुमारे एक हजार हेडलॅम्प, ८०० ग्लू गन आणि डझनभर दुर्बिणी मिळाल्या आहेत.

‘मी माझ्या कारमध्ये हेडलॅम्प आणि ग्लू गन घेऊन फिरते’

स्मिथने WUSA-TV ला सांगितले की, आता मी माझ्या कारमध्ये हेडलॅम्प आणि ग्लू गन घेऊन फिरते आणि मला भेटणाऱ्या प्रत्येकाला ते मी देत असते. स्मिथचा पत्ता पॅकेजवर आहे, परंतु नाव लिक्सियाओ झांग असं लिहिलं आहे. स्मिथने सांगितले की, त्याने हे नाव यापूर्वी कधीही ऐकलेलं नाही. ती पुढे म्हणाली, “आम्हाला सुरुवातीला वाटले की हा काही घाटाळा आहे, परंतु ही पॅकेट्स येतच राहिली.”

हेही पाहा- रीलसाठी कायपण! पंपावर चक्क पेट्रोलनेच बाईक धुवायला सुरुवात केली अन्…, व्हायरल Video पाहून डोकंच धराल

यापूर्वीही घडली आहेत अशी प्रकरणे-

दरम्यान अचानक अशी पार्सल मिळण्याची ही पहिली घटना नाही. वॉशिंग्टन, डी.सी. लिझ गेल्टमॅन नावाच्या व्यक्तीला मे महिन्यात अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला जेव्हा त्याच्या घरी लहान मुलांच्या चादर असलेले पार्सल आले होते, जे त्यांनी ऑर्डरही केले नव्हते.

अचानक इतकी पार्सल कशी आली?

अ‍ॅमेझॉनच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांनी या सर्व घटनेचा तपास केला आणि असे आढळले की स्मिथ आणि गेल्टमॅनचे दोन्ही पॅकेज विक्रेत्यांनी अ‍ॅमेझॉन पूर्ती केंद्रांमधून न विकलेला माल काढून टाकण्यासाठी अनियमित पत्त्यावर पाठविण्याचा हा परिणाम होता. न्यूयॉर्कमधील वकील सीजे रोसेनबॉम यांनी सांगितले की, असे विक्रेते काही पत्ता शोधतात आणि नंतर जेव्हा त्यांना त्यांची विक्री न झालेली उत्पादने अ‍ॅमेझॉनच्या गोदामांमधून हलवण्याची आवश्यकता असते तेव्हा ते तिथे पाठवतात कारण त्यांच्यासाठी असे करणे स्वस्त असते, तर ज्या विक्रेत्याने ही पार्सल पाठवली आहेत, त्याचं अकाऊंट बंद केल्याचं अ‍ॅमेझॉनकडून सांगण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending woman received more than 100 parcels never ordered asking she said now i carry them in the car jap
Show comments