भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. फ्रॉड करण्यासाठी हॅकर्स कॉलिंग, एसएमएस आणि इन्स्टंट मेसेजिंग Apps द्वारे लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सध्या स्पॅम करण्यासाठी सर्वात जास्त मेसेजिंग Apps पैकी एक आहे ते म्हणजे WhatsApp. WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकतो. आपले फोटोज, व्हडिओज शेअर करू शकता. व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल्स करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपचे भारतामध्ये ५०० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. मात्र आता WhatsApp वापरकर्त्यांना स्पॅमपासून वाचवण्यासाठी Truecaller ने मेटाशी हातमिळवणी केली आहे. जेणेकरून वापरकर्त्यांना प्लेटफ्रॉमवरील स्पॅम मेसेज ओळखण्यात आणि ब्लॉक करण्यात मदत होईल.कॉलर आयडी आणि स्पॅम ब्लॉकिंग असलेले सॉफ्टवेअर Truecallers वापरकर्त्यांना इंटरनेटवरून संभाव्य स्पॅम कॉल शोधण्यात वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर identification सर्व्हिस सुरु करण्याचा विचार करत आहे. हे फिचर मी महिन्याच्या शेवटी जागतिक स्तरावर आणले जाणार आहे असे Truecaller चे Chief Executive अ‍ॅलन मामेदी यांनी रॉयटर्सला सांगितले.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…

हेही वाचा : Tech layoffs: मंदीचे सावट आणखी गडद; आता Linkedin करणार तब्बल ‘इतकी’ नोकरकपात

इंटरनेटवरील स्पॅम कॉल्सशिवाय टेलिकॉम रेग्युलेटर असणाऱ्या Trai ने देखील टेलिकॉम कंपन्यांना ऑफलाइन येणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि SMS ब्लॉक करण्यास सांगितले आहे. यासाठी टेलिकॉम कंपन्या Airtel आणि Jio यांनी AI वर आधारित सेवा रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. Truecaller चे सह-संस्थापक आणि CEO अ‍ॅलन मामेदी म्हणाले, भारतामध्ये स्पॅम कॉल्स ही एक मोठी समस्या आहे. जिथे वापरकर्त्यांना दर महिन्याला १७ अनोळखी कॉल्स येतात.

WhatsApp साठी Truecaller चे स्पॅम डिटेक्शन कसे वापरावे ?

Step -1 : Google Play Store वर जाऊन Truecaller बीटा प्रोग्राममध्ये सामील व्हावे.

१. google play store वर जाऊं Truecaller सर्च करावे.

२. त्यानंतर लिस्टिंग पेज स्क्रोल करा आणि बीटा टेस्टर सेक्शनमध्ये join बटणावर क्लिक करा.

३. थोडा वेळ थांबून पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर ट्रूकॉलर सर्च करावे.

४. त्यानंतर बीटा अपडेट इन्स्टॉल करा.

हेही वाचा : Tech layoffs: मंदीचे सावट आणखी गडद; आता Linkedin करणार तब्बल ‘इतकी’ नोकरकपात

Step -2 : WhatsApp आणि अन्य Apps साठी कॉलर आयडी कसे अ‍ॅक्टिव्ह करायचे ?

१. सर्वात प्रथम truecaller ओपन करून सेटिंग्जमध्ये जावे.

२. कॉलर आयडीवर क्लिक करा आणि त्यानंतर Whatsapp आणि इतर मेसेजिंग apps मध्ये अनोळखी नंबर ओळखण्यासाठी टॉगल चालू करा.