एखाद्याच्या फोन नंबरवरुन त्याचं नाव व त्याच्याबाबतची अन्य माहिती देणाऱ्या Truecaller या लोकप्रिय अॅपने अलिकडेच एक जबरदस्त फिचर लॉन्च केले आहे. त्यामुळे या फीचरमुळे वापरकर्त्यांना TrueCaller वापरणे सोपे होणार आहे. Truecaller ने वापरकर्त्यांसाठी एक नवीन लाईव्ह कॉलर आयडी फिचर लॉन्च केले आहे. जे वापरकर्त्यांना कॉलरचे डिटेल्स सर्च करण्यासाठी मदत करणार आहे. हे फिचर काय आहे आणि कोणत्या वापरकर्त्यांसाठी हे फिचर लॉन्च करण्यात आले आहे हे जाणून घेऊयात.
Truecaller ने हे फीचर आयफोन वापरकर्त्यांसाठी लोणच केले आहे. ट्रूकॉलरने Apple च्या व्हर्च्युअल सिस्टिमला आपल्या सिस्टीमशी जोडले आहे. याचे कारण म्हणजे आयफोन वापरकर्ते लवकरच डिटेल्स शोधू शकतात. हा फिचर अजून सर्वांसाठी रोलआऊट करण्यात आलेले नाही.
हेही वाचा : Vodafone-Idea ने अपडेट केले ‘हे’ दोन प्लॅन, आता वर्क फ्रॉम होम करणे होणार आणखीन सोपे
कसे काम करणार Live Caller ID हे फिचर ?
या फीचर अंतर्गत जेव्हाही आयफोन वापरकर्त्याला अनोळखी नंबरवरून इनकमिंग कॉल येईल तेव्हा ते फक्त “Hey Siri, Search Truecaller” बोलून त्यांच्या आवाजाने Truecaller अॅक्टिव्ह करू शकतील. इतके ऐकले की App लगेच तो नंबर लगेचच सर्च करेल. आणि ज्याने तुम्हाला कॉल केला आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला दाखवेल. ही माहिती स्क्रीनच्या वरच्या बाजूला दिसेल.
हे नवीन फीचर फक्त त्या Truecaller वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांनी iOS 16 आणि त्यावरील मॉडेलचे सब्स्क्रिप्शन घेतले आहे. म्हणजेच हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला Truecaller चे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. थोडक्यात हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. लवकरच हे फीचर अन्य देशांमध्ये रोलआउट केले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले.
हेही वाचा : Vodafone-Idea ने अपडेट केले ‘हे’ दोन प्लॅन, आता वर्क फ्रॉम होम करणे होणार आणखीन सोपे
कसा कराल सेटअप ?
१. सर्वात पहिल्यांदा App च्या प्रीमियम टॅबमध्ये जाऊन ‘Add to Siri’ वर क्लिक करावे.
२. सिरी शॉर्टकट सेट केल्यावर तुम्हाला फक्त ‘Hey Siri, Search Truecaller’ म्हणावे लागेल आणि Truecaller लगेच सांगेल तुम्हाला कोण फोन करत आहे.
महत्वाचे : तुम्ही सेटअप करत असताना हे तुम्हाला एका टॅपने शॉर्टकट जोडण्यात मदत करते. तुम्ही पहिल्यांदा हे फीचर वापरता तेव्हा तुम्हाला Truecaller ला प्रवेश परवानगी देण्यास सांगितले जाईल. पुन्हा सूचना मिळू नये म्हणून तुम्ही ”Always Allow” निवडू शकता.