Tumblr move all blogs to WordPress : टम्बलर (Tumblr) हे अ‍ॅप जगात बऱ्याच युजर्सद्वारे वापरले जाते. या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची मालकी याहूकडे आहे. जगातील कोट्यावधी लोक हे व्यासपीठ वापरतात. हे एक्स (ट्विटर) सारखेच खूप लोकप्रिय अ‍ॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर आपण मजकूर, फोटो, व्हिडीओ, लिंक शेअर करू शकतो. हे वापरणंही सोपं आहे. Tumblr ला एक्स (ट्विटर) चा जगभरातला सर्वात मोठा स्पर्धक मानला जातो. पण, आता Tumblr कंपनीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कंपनी सर्व टम्बलर ब्लॉग, अर्धा अब्ज पेक्षा जास्त रक्कम, वर्डप्रेस बॅक एंडवर स्थलांतर (शिफ्ट) करण्याची योजना आखते आहे. तसेच या निर्णयाचा उद्देश WordPress.com च्या सुविधांचा लाभ घेणे, दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी फीचर्सचा वापर करणे असा आहे.

युजर्सना पहिलं प्राधान्य :

काही गोष्टी बॅकएंडला शिफ्ट होत असूनही, Tumblr वरील फ्रंट-एंड युजर्सच्या अनुभवाला पहिलं प्राधान्य दिलं जाईल. म्हणजेच त्यांच्या पोस्ट करण्याच्या कोणत्याही कृतीत बदल केला जाणार नाही. तसेच कंपनीचे ब्लॉग, रक्कम वर्डप्रेस बॅक एंडवर स्थलांतर Tumblrचे पॉवरफुल व कस्टमाइझेबल नेचर यांच्यातील समतोल साधण्यासाठी ही रचना करण्यात येणार आहे. हे स्थलांतर कधी होईल याची तारीख अद्याप सांगितली नसली, तरीही हे ‘इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठ्या स्थलांतरांपैकी एक’ असणार आहे असे सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा…Aadhaar Card Update : आधार कार्डमधील कोणती माहिती घरबसल्या करता येते अपडेट? ‘ही’ पाहा लिस्ट अन् मोफत करा ‘या’ तारखेपूर्वी आधार कार्ड अपडेट

Tumblr साठी ऑटोमॅटिक एक्विजिशन व भविष्यातील योजना :

Yahoo द्वारे एक मिलियन अमेरिकन डॉलरमध्ये विकत घेण्यात आलेले टम्बलर आज ऑटोमॅटिकनेटम्बलरला तीन मिलियन अमेरिकन डॉलर फायर सेलमध्ये विकत घेतले. ऑटोमॅटिकने टम्बलरकडून इतर प्रकल्पांसाठी घेतलेल्या संसाधने व कर्मचाऱ्यांचे पुन्हा वाटप केले आहे. हे बदल असूनही प्लॅटफॉर्मच्या वाढीचा आणि विकासाचा एक भाग म्हणून, कंपनी भविष्यात नवीन फीचर्सना पाठिंबा देण्याचे आश्वासन देते आहे.

स्थलांतराचे काय होतील फायदे ?

ऑटोमॅटिक टीमला दोन्ही प्लॅटफॉर्मवर कार्य करणारी साधने व फीचर्स विकसित करण्यास सक्षम करेल. तसेच टम्बलरला WordPress.org वरील फ्री व ओपन सोर्स वापरण्याची परवानगी देईल. पण, टम्बलरवर पोस्ट केलेले ब्लॉग स्थलांतरित करणे तांत्रिक आव्हानदेखील ठरू शकते. मात्र, या अडथळ्यांना न जुमानता, ऑटोमॅटिकला हे स्थलांतर यशस्वीपणे अमलात आणण्याच्या क्षमतेवर विश्वास आहे.