एलॉन मस्क यांनी Twitter ची खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये सातत्याने काही बदल करण्याचा प्रयत्न मस्क करत आहेत. अनेक निर्णय ते घेत आहेत. मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ट्विटरने २६ जानेवारी २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कंपनीच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतातील ६,८२,४२० अकाउंट्स बंद केली आहेत. या अकाउंट्सवरून बाल लैंगिक शोषण आणि गैर-सहमतीने नग्नतेला प्रोत्साहन दिल्याचे कारण देत ट्विटरने ही कारवाई केली आहे.
दहशतवादाला प्रोस्ताहन देणाऱ्या १,५४८ अकाउंटवर देखील ट्विटरने बंदी घातली आहे. ट्विटरने ननवीन IT नियम २०२१ चे पालन करताना आपल्या मासिक अहवालामध्ये सांगितले की तक्रार निवारण यंत्रणेद्वारे भारतातील वापरकर्त्यांकडून त्यांना ७३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याशिवाय जे अकाउंट बंद करण्यासाठी अपील करत होते अशा २७ अकाउंट्सवर ट्विटरने कारवाई केली आहे. कंपनीने सांगितले की, परिस्थितीच्या तपशीलांचा आढावा घेतल्यानंतर आम्ही यापैकी १० अकाउंट्सचे निलंबन मागे घेतले आहे. बाकीची खाती बंद करण्यात आली आहेत.
हेही वाचा : पाकिस्तानविरुद्ध भारताने केली ‘ही’ मोठी कारवाई, काय आहे नेमके प्रकरण ?
नवीन IT नियम २०२१ अंतर्गत ५० लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असणाऱ्या सर्व डिजिटल आणि सोहळा मीडिया प्लॅटफॉर्मने सर्व आवश्यक माहितीचा एक रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये Twitter, WhatsApp, YouTube, Facebook आणि बरेच काही समाविष्ट आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. जेव्हा कोणीही पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कायदेशीर मागणीला (Legal Demand) प्रतिसाद मिळाल्यानंतर पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे असे उत्तर मिळते. कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून @GovtofPakistan चे अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.