Elon Musk यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून नवनवीन निर्णय कंपनी घेत आहे. सध्या ट्विटरच्या एका कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग काउन्सिल म्हणजेच (BBC) आणि ट्विटरमध्ये वाद सुरु झाला आहे. ट्वीटरने बीबीसीच्या व्हेरिफाइड ट्विटर अकाउंटला ‘गव्हर्मेंट फंडेड मिडिया’ असे लेबल लावले आहे. ट्विटरच्या या कृतीमुळे बीबीसीच्या मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीबीसीच्या वतीने ट्विटर मॅनेजमेंटसमोर या कृतीबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला आहे. आमच्यावर लावण्यात आलेले हे लेबल ट्विटरने तात्काळ हटवावे असे बीबीसीने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीबीसी इंग्लंडमध्ये अनेक वर्षांपूर्वी स्थापन झालेली कंपनी आहे, जी ब्रिटिश सरकारद्वारे देखील चालवली जात होती. जिथून बीबीसीला निधी मिळत असे. हळूहळू बीबीसीने संपूर्ण जगभरामध्ये ब्रॉडकास्ट चॅनेल आणि न्यूज पोर्टल लॉन्च केले. २१ व्या शतकाच्या सुरुवातीस ही एक लोकप्रिय संस्था झाली. मात्र याचे बीबीसी असेच कायम राहिले. बीबीसीचे आजच्या काळामध्ये अनेक भाषांमध्ये टेलिव्हिजन शो,रेडिओ शो, पॉडकास्ट आणि ब्रेकिंग न्यूज पोर्टल सुरु आहेत.

हेही वाचा : Salesforce मधून नोकरी गेल्यावर महिला कर्मचारी भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “मला सुरुवातीला…”

बीबीसी आणि ट्विटरमधील काय आहे नेमका वाद ?

बीबीसीची ट्विटरवर अनेक अकाउंट्स आहेत. ट्विटर सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांच्या ओळखीवर आधारित विशेष लेबले लावत आहे, त्यामुळे २.२ दशलक्ष फॉलोअर्स असलेले ‘बीबीसी’ चे अकाऊंट देखील त्या कक्षेत आले आहे. ट्विटरने ‘बीबीसी’वर ‘सरकारी अनुदानित मीडिया’ असे लेबल लावले आहे. ज्यावर ‘बीबीसी’ने आक्षेप घेतला आहे. ”आम्ही एक ‘स्वतंत्र’ वृत्तसंस्था असल्यामुळे Twitter ने आमच्या अकाऊंट वरून ‘सरकारी अनुदानित मीडिया’चे लेबल त्वरित काढून टाकावे असे बीबीसीने म्हटले आहे.” बीबीसीच्या निवेदनात म्हटले आहे , “आम्ही ट्विटर अधिकार्‍यांशी या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी बोलत आहोत. बीबीसी स्वतंत्र आहे अणि नेहमी असेच राहिले आहे.

ट्विटरचे म्हणणे काय ?

ट्विटरच्या ‘लेबल’बाबत, ट्विटरच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की, हे लेबल अशा अकाऊंटला लागू केले जाते जे सरकारी संस्था म्हणून काम करतात किंवा ज्यांना सरकारकडून निधी मिळतो. आता ट्विटर बीबीसीच्या अकाऊंटवरून ‘गव्हर्नमेंट फंडेड मीडिया’ हे लेबल हटवणार की तसेच ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter bbc controversy government funded media company said we are independent news organization tmb 01