Twitter Blue Tick Verification Cost in India: नव्या बदलांनंतर ट्विटर ब्लु टिक व्हेरीफीकेशनसाठी किती किंमत मोजावी लागेल हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. ट्विटर युजर याबाबतच्या नव्या अपडेटची वाट पाहत असतानाच ट्विटरकडुन ब्लु टिक व्हेरीफिकेशन आजपासून (१२ डिसेंबर २०२२) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ब्लु टिक व्हेरीफीकेशनसाठीच्या नव्या किंमती आणि नव्या फीचरबाबत माहिती देण्यात आली आहे.
ट्विटकडुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये ब्लु टिक संदर्भातील नव्या किंमती आणि फिचर्सबाबत माहिती देण्यात आली आहे. यामधील माहितीनुसार वेबसाठी ब्लु टिकची किंमत ८ डॉलर असेल, तर आयओएससाठी ११ डॉलर असेल.
आणखी वाचा: Twitter: आता आतून असे दिसते ट्विटरचे मुख्यालय; Viral Photo पाहून तुम्हीही चकित व्हाल
एलॉन मस्क यांनी ट्विटरवर विविध रंगी टिक व्हेरीफीकेशन उपलब्ध असतील असे जाहिर केले होते, त्यानुसार आता ट्विटरवर सोनेरी आणि राखाडी चेकमार्क म्हणजेच व्हेरिफीकेशन टिक उपलब्ध असेल. अधिकृत अकाउंट्सना सोनेरी टिक मिळेल तर सरकारी संस्थांना ग्रे टिक मिळेल.
आणखी वाचा: १०० रुपयांच्या आतील जिओचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते? जाणून घ्या किंमत आणि त्यावरील ऑफर
ब्लु टिक असणाऱ्या युजर्ससाठी विशेष फिचर्स उपलब्ध असतील. त्यांच्यासाठी ट्वीट एडिट करणे, १०८० पिक्सलचे व्हिडीओ अपलोड करणे, रीडर मोड अशे विशेष फिचर्स वापरता येणार आहेत.