Elon Musk यांनी गेल्या वर्षी ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर त्यांनी कंपनीमध्ये अनेक बदल केले आहेत. अजून काही बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या ते ट्विटरचे सीईओ आहेत. कर्मचारी कपात, blue tick काढणे असे अनेक निर्णय त्यांनी आतापर्यंत घेतले आहेत. आतासुद्धा एलॉन मस्क यांनी असाच एक निर्णय घेतला आहे. मस्क यांनी घेतलेला निर्णय काय आहे ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी गेल्या वर्षी सोशल मीडिया कंपनीची सूत्रे हाती घेतल्यापासून कंपनीच्या धोरणांमध्ये अनेक बदल केले आहेत. नवीन घेतलेल्या निर्णयांमध्ये मस्क यांनी पालकांच्या रजेचा (parental leaves) कालावधी कमी केला आहे. हा कालावधी १४० दिवसांवरून केवळ १४ दिवस इतका करण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला आहे. म्हणजेच पालक झालेल्या कर्मचाऱ्यांना आता बाल संगोपनासाठी केवळ १४० दिवसांऐवजी १४ दिवसांचीच रजा मिळणार आहे. याबाबतचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.

हेही वाचा : आता Earphones नसले तर ‘या’ बसमध्ये NO ENTRY, जेलमध्ये सुद्धा जावं लागू शकतं; जाणून घ्या नेमका काय आहे नियम?

या बदलामुळे अमेरिकेतील ज्या राज्यांमध्ये पगारी रजेचा धोरण नाही अशा राज्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम अधिक परिणाम होणार आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या मेलमध्ये ट्विटरने यापूर्वी कर्मचाऱ्यांना २० आठवड्यांची पेड पॅरेन्टल रजा ऑफर केली होती. कर्मचारी काम करत असलेल्या प्रादेशिक कायद्यानुसार आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहेत. आता १४० दिवसांपेक्षा ‘टॉप अप’ देऊन दोन आठवड्यांची रजा दिली जात आहे.न्यूयॉर्क पोस्टमधील एका रिपोर्टनुसार, अमेरिकेमध्ये पेड पॅरेन्टल रजा अनिवार्य करणारा कोणताही फेडरल कायदा नाही आहे. तथापि, कौटुंबिक आणि वैद्यकीय रजा कायदा विशिष्ट कर्मचार्‍यांना १२ आठवड्यांपर्यंत कौटुंबिक आणि वैद्यकीय कारणांसाठी रजा घेण्याची परवानगी देतो.

कॅलिफोर्नियामधील कर्मचाऱ्यांना अमेरिकेतील राज्य कायद्यानुसार आठ आठवड्यांपर्यंत सशुल्क रजा घेता येते. याव्यतिरिक्त न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी ही दोन्ही राज्ये २६ आठवड्यांपर्यंत विनावेतन रजेची परवानगी देतात. एलॉन मस्क यांच्या या निर्णयावर अनेक लोकांनी टीका केली आहे. अनेकांनी अब्जाधीश मस्क यांना फटकारले आहे.