Twitter हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क आहे. मागील वरशील त्यांनी ट्विटरची खरेदी केली आहे. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. मग ते कर्मचाऱ्यांची कपातीचा निर्णय असो, किंवा blue tick हटवण्याचा निर्णय असो. असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. आतासुद्धा ट्विटर वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. ट्वीटर लवकरच Inactive अकाउंट्स बंद करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ट्वीटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोमवारी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली. वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेली अकाउंट्स बंद केली जाणार आहेत. दरम्यान ट्वीटरवर अशी हजारो अकाउंट्स आहेत , ज्यावर कोणतीही पोस्ट शेअर केली जात नाही.
हेही वाचा : काय सांगता! मतदानासाठी आता रांगेत थांबण्याची गरज नाही, फक्त सेल्फी घ्या अन्…
जे कोणी आपले अकाऊंट नियमितपणे वापरत नाहीत त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लवकरच कमी होऊ शकते. मायक्रोब्लॉगिंग साईट असलेले ट्वीटर लवकरच कोणत्याही प्रकारची गतिविधी नसलेले अकाउंट्स हटवण्यास सुरुवात करेल.
जर का ट्विटर अकाऊंट कायमचे बंद होण्यापासून रोखण्यासाठी महिन्यातून किमान एकदा वापरकर्त्यांना त्यांच्या आकाऊंटमध्ये लॉग इन करणे आवश्यक आहे असे ट्विटरचे धोरण आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एलॉन मस्क यांनी नॅशनल पब्लिक रेडिओची ५२ ट्विटर अकाउंट्स अन्य कोणत्यातरी कंपनीला देण्याची धमकी दिली होती. या मागचे कारण म्हणजे त्या अकाउंट्सनी ट्वीटर फिडवर कंटेंट पोस्ट करणे बंद केले होते.
ट्वीटरने गेल्याच महिन्यात सेलिब्रेटी, पत्रकार आणि प्रमुख राजकारण्यांसाह हजारो लोकांच्या अकाऊंटवरुन मोफत असणारी Blue Tick काढून टाकली होती. कारण ट्वीटरने blue tick साठी पेड सब्स्क्रिप्शन सुरू केले होते. मात्र अनेकांनी त्यासाठी पैसे भरले नाहीत म्हणून कंपनीने ब्लू टिक हटवण्याचा निर्णय घेतला होता.