Twitter ही एक मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. Elon Musk हे ट्विटरचे प्रमुख आहेत. त्यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये साततयाने अनेक एवेगवेगळे निर्णय घेतले आहे. १ एप्रिल पासून ब्ल्यू टिक काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. आता याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. अब्जाधीश मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिक कोणत्या दिवसापासून काढण्यात येणार आहे याची नवीन डेडलाईन जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जर का एखाद्या वापरकर्त्याला आपले ब्लू टिक तसेच ठेवायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. एलॉन मस्क हे कोणत्या तारखेपासून ब्लू टिक काढून टाकणार आहेत हे जाणून घेऊयात.

हेही वाचा : Twitter चा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून रद्द होणार Blue Tick, व्हेरिफाइड अकाउंटसाठी…

एलॉन मस्क यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी ब्लू टिक काढण्याची अंतिम तारीख ४/२० अशी दिली आहे. तथापि ४/२० म्हणजे २० एप्रिलच आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. मस्क यांनी ज्या तारखेची घोषणा केली आहे तो एक प्रकारचा विनोद देखील असण्याची शक्यता आहे. याआधी ब्लू टिक काढून टाकण्यासाठी १ एप्रिल ही तारीख जाहीर केली होती. मात्र, आता मस्क यांनी ट्विट करून ४/२० ही अंतिम तारीख दिली आहे.

४/२० या तारखेमुळे एलॉन मस्क हे याआधीही अडचणीत सापडले आहेत. वास्तवी २०१८ सालामध्ये एलॉन मास्क यांनी टेस्लाला $४२० डॉलर प्रति शेअर या दराने खासगी कंपनी बनवण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांना तसे करता आले नव्हते. त्यामुळे त्यांना गुंतवणूकदारांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. त्याचवेळी खोटे ट्विट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

ट्विटरने हे पाऊल उचलल्यामुळे वापरकर्त्यांना महिन्याला पैसे भरावे लागणार आहेत. सब्स्क्रिप्शन घेणाऱ्या वापरकर्त्यांना कंपनी काही खास फीचर्स देखील देणार आहे. यामध्ये जाहिराती दिसण्याचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच ट्विट पोस्ट करण्याआधी लिहिण्यासाठी अधिक शब्द वापरता येणार आहेत. तसेच तुम्हाला ट्विट एडिट देखील करता येणार आहे. या फीचर्ससह व्हेरीफाईड अकाउंट्ससाठी कंपनी अजूनही काही फीचर्स देऊ शकते.

भारतातातील वेब वापरकर्त्यांना ट्विटर ब्लू साठी दर महिन्याला ६५० रुपये आणि Android आणि iOS वापरकर्त्यांना दर महिन्याला ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. ट्विटरच्या या निर्णयामुळे प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार, सरकारी अधिकारी आणि सामान्य लोकांना यापूर्वी मोफत ब्लु टिक मिळत होती त्यासाठी त्यांना आता पैसे मोजावे लागणार आहेत.