Twitter character limit will increase : मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कंपनीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ट्विटरमध्ये ते अनेक बदल घडवतील अशी शक्यता होती आणि तसेच झाले. ब्लू टीक सेवा शुल्कासह उपलब्ध करण्यात आली. नोकर कपात करण्यात आली. या दरम्यान अक्षर मर्यादेत काही सूट मिळेल अशीही शक्यता होती. याबाबत आता सूचक संकेत मिळाले आहे. ट्विटरवरील अक्षरमर्यादा विद्यमान २८० वरून ४ हजार पर्यंत वाढवली जाईल याची पुष्टी ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरवर केली आहे.

ट्विटर अक्षरम र्यादा २८० वरून ४ हजार पर्यंत वाढवणार आहे का? असा प्रश्न एका ट्विटर युजरने मस्क यांना विचारला असता प्रतिक्रियेत मस्क यानी ‘हो’ असे उत्तर दिले आहे. मात्र, हा बदल कधी होणार? याबद्दल त्यांनी माहिती दिलेली नाही. या बदलावर ट्विटर युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहे.

ट्विटरसाठी ही सर्वात वाईट गोष्ट असेल

(दोन काम करतो ‘हा’ हेडफोन, अनोख्या फीचरमुळे चर्चेत, दुसरे काम कोणते? जाणून घ्या)

मस्क यांच्या प्रतिक्रियेवर एका ट्विटर युजरने नाराजी व्यक्त केली. अक्षर मर्यादा ४ हजार पर्यंत ठेवण्याच्या विषयावर बोलताना, ट्विटरसाठी ही सर्वात वाईट गोष्ट ठरेल, असे एका युजरने म्हटले. ट्विटरमध्ये पूर्वी १२० शब्दांची मर्यादा होती, नंतर ती २८० झाली. शॉर्ट फॉरमॅट ही ट्विटरची खासियत आहे, ते त्याच्या नावातही आहे. ते ट्विट आहे, उल्टी नाही, असेही युजरने म्हटले.

दुसऱ्या एका युजरने मत व्यक्त करत, यामुळे गोष्टी मंदावतील. अनेक लकांना मोठे ट्विट वाचण्याचा आळस येतो. ही कल्पना चांगली नाही, असे म्हटले. तर दुसऱ्या एका युजरने ४५० अक्षर मर्यादा ठीक आहे, शॉर्ट फॉर्म प्लाटफॉर्मसाठी ४००० हे फार झाले, अशी प्रतिक्रिया दिली.

(META LAYOFFS: ६ वर्षीय चिमुकलीच्या प्रतिक्रियेची इंटरनेटवर चर्चा, आईची नोकरी गेल्यावर म्हणाली “तू अजूनही..”)

ट्विटर ब्लू टिक पुन्हा सुरू

ट्विटरकडून ब्लू टिक रीलाँच करण्यात आले आहे. यामध्ये नवीन फिचर्स उपलब्ध होणार आहेत. तसेच यामध्ये सोनेरी आणि राखाडी असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. ट्विटरकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये ब्लू टिक संदर्भातील नव्या किंमती आणि फिचर्सबाबत माहिती देण्यात आली आहे. यामधील माहितीनुसार, वेबसाठी ब्लू टिकची किंमत ८ डॉलर (661.92 रुपये) असेल, तर आयओएससाठी ११ (910.13 रुपये) डॉलर असेल.