सोशल मीडियाच्या क्षेत्रातील मातब्बर अशा मेटा कंपनीच्या इन्स्टाग्रामने स्वतःचे थ्रेड हे मायक्रोब्लॉगिंग ॲप लॉन्च केले आहे. ट्विटरच्या इतर स्पर्धकांपेक्षा थ्रेड वेगळे आहे. थ्रेड्स ॲप हे इन्स्टाग्रामचेच दुसरे रूप आहे. फक्त यावर फोटो आणि व्हिडिओ कटेंटऐवजी मजकूर व संवादावर आधारित कटेंटला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. इन्स्टाग्राम अकाउंटचे लॉगिन डिटेल्स वापरून थ्रेड्सवर अकाउंट बनवणे शक्य होणार आहे. थ्रेड्सवर गेल्यानंतर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता आणि तिथे सुरू असलेल्या चर्चांमध्ये सहभागी होऊ शकता. ‘इन्स्टाग्राम’मध्ये असलेले कमेंट सेक्शन थ्रेड्समध्येही देण्यात आले आहे.

हे अ‍ॅप ट्विटरला टक्कर देणार आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. हे App वापरकर्त्यांना फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या अकाउंट्सना परवानगी देते. मेटाच्या थ्रेड्सला खूप पसंती मिळत आहे. आज आपण अशा काही फीचर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे एलॉन मस्क यांच्या ट्विटरवर वापरकर्त्यांना मिळतात. मात्र नुकत्याच मेटाने लॉन्च केलेल्या थ्रेड्स मध्ये मिळत नाहीत. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
group of women amazing dance on famous song Dilat Zapuk Zupuk vajta rahtay
“दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच
do you know advantage of pressing red button in pune
पीएमटी बसमधील या लाल बटणाचा काय उपयोग आहे? VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : काही तासांतच Threads चे ‘एवढे’ मिलियन युजर्स; ट्विटर, इन्स्टाग्रामला किती कालावधी लागला? वाचा…

हॅशटॅग

हॅशटॅगचा अर्थ असा होतो की ट्विटर किंवा थ्रेड्सवर एखादा विषय ट्रेंड मध्ये असल्यास हॅशटॅग दिला जातो. हे फिचर सध्या ट्विटरमध्ये उपलब्ध आहे. मात्र थ्रेड्समध्ये ते उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. इन्स्टाग्राम आणि फेसबुक सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप वर्षांपासून हॅशटॅगचा सपोर्ट मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये थ्रेड्समध्ये देखील याचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

वेब व्हर्जन

वापरकर्त्यांना ट्विटर कोणत्याही वेब ब्राउझरवर ओपन करता येते. सध्या थ्रेड्स केवळ App पुरतेच मर्यादित आहे. Threads.net ही अधिकृत वेबसाइट असताना, ती फक्त वापरकर्त्यांना थ्रेड्सची Android किंवा iOS व्हर्जन डाउनलोड करण्याची परवानगी देते.

पोस्ट एडिट करता येत नाहीत

ट्विटरने नुकतेच आपल्या प्रीमियम वापरकर्त्यांसाठी ट्विट एडिट करण्याचा पर्याय दिला आहे. मेटा थ्रेड्समध्ये एकदा तुमची पोस्ट प्रकाशित झाली एडिट करण्याची परवानगी मिळत नाही. थ्रेड्स App वर ती पोस्ट डिलीट करावी लागेल किंवा नवीन पोस्ट तयार करावी लागेल. फेसबुक व इन्स्टाग्रामवर हे उपलब्ध असल्याने काही दिवसांतच ते थ्रेड्सला मिळू शकते.

DM करण्याचा पर्याय

थ्रेड्स आपल्या वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट मेसेज करण्याची परवानगी देत नाही. त्याने अलीकडे अतिरिक्त गोपनीयतेसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन पर्याय सक्षम केला आहे. म्हणजेच वापरकर्ते एकमेकांशी खाजगीरित्या कनेक्ट होऊ शकत नाहीत.

AI जनरेटेड टेक्स्ट

Alt टेक्स्ट किंवा पर्यायी कंटेंट हे फोटो किंवा व्हिडीओचे वर्णन आहे. बहुतेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना Alt टेक्स्ट कस्टमाइज करण्याची परवानगी देतात. मात्र थ्रेड्सवर तसे करता येत नाही.

ट्रेडिंग विषय

ट्रेडिंग विषय हा ट्विटरवर घडणाऱ्या बातम्या शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. द व्हर्जशी संवाद साधताना, इंस्टाग्रामचे सीईओ म्हणाले की थ्रेड्स “हार्ड न्यूज” साठी नाहीत. यामुळे याला ट्रेडिंग विषय लवकरच दिसण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा : काही तासांतच Threads चे ‘एवढे’ मिलियन युजर्स; ट्विटर, इन्स्टाग्रामला किती कालावधी लागला? वाचा…

एम्बेड पोस्ट

थ्रेड्स वापरत असताना त्यावर तुम्हाला काही उपयुक्त मिळाले आणि ते तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर एम्बेड करायचे असेल तर तसे करता येत नाही. थ्रेड्सवर एम्बेड पोस्ट लिंक तयार करण्याची कोणतीही सुविधा नाही. ट्विटर वापरकर्त्यांना बऱ्याच काळापासून एम्बेडेड पोस्ट लिंक्स तयार करण्याची परवानगी देत आहे.

जाहिरात

ट्विटरवर अनेक जाहिरात दिसतात. मात्र थ्रेड्स जाहिराती दाखवत नाही. थ्रेड्सवर १ अब्ज वापरकर्ते आल्याशिवाय तिथे जाहिराती दिसू शकत नाहीत असे मार्क झुकरबर्ग यांनी सूचित केले.