सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. ट्विटरची सेवा ठप्प झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ट्विटर बंद झाल्यामुळे वापरकर्त्यांना स्टोरी फीड करताना त्रास झाला. तसेच वापरकर्त्यांना ट्विट सुद्धा करता येत नव्हते. मागील एस तासापासून ट्विटर डाऊन झाले आहे. यामुळे वापरकर्त्यांची नाराज होत #TwitterDown हा ट्रेंड सुरु केला आहे.

डाऊन डिटेक्टरनुसार, ट्विटरवर हा प्रॉब्लेम दुपारी ३. ४७वाजल्यापासून यायला सुरुवात झाली. यामुळे जगभरातील ट्विटरच्या वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. ट्विटरमध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या देशांमधून येऊ लागल्या. वापरकर्ते ट्विटर मोबाईल आणि वेबसाईटवर वापरू शकत नव्हते.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shocking video of Kidnapping where a man saved girls life video viral on social media
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Health tips diet advice from social media influencers can be harmful
तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा; शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम
Uddhav Thackeray Amol Kohle
“अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार”, ठाकरेंच्या शिवसेनेचा पलटवार
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
Mother Play Aaj Ki Raat On harmonium And Son dancing
Video: आई-मुलाची जोडी इन्स्टाग्रामवर व्हायरल! ‘आज की रात’ गाण्यावर चिमुकल्याचा जबरदस्त डान्स; ठुमके, हावभाव पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
Zuckerberg ends fact checking on Metas Facebook Instagram
‘Facebook’ आणि ‘Instagram’ मध्ये मोठा बदल; ‘या’ निर्णयामुळे अफवांचे प्रमाण वाढणार का?

हेही वाचा : रुपया खर्च न करता लॅपटॉपचा वेग करा सुपरफास्ट; ‘या’ ५ टिप्स वाचवतील पैसे व वेळ

यूएस, युके , जपान आणि भारतातील वापरकर्त्यांना ट्विटर फीड आणि ट्विट पोस्ट करताना समस्या जाणवल्या. सोशल मीडियावर वापरकर्त्यानी ट्विटर वापरता येत नसल्याची तक्रार केली. तर काही वापरकर्त्यांची याबद्दल मजा करताना दिसले. ट्विटर बंद होण्यामुळे काही जणांच्या व्यवसायावर आणि कामावर देखील परिणाम झाला.

जगभरातील वेबसाईट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर ठेवणाऱ्या डाऊन डिटेक्टर या वेबसाइटला ट्विटर डाऊन असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६१९ तक्रारी भारतातून आल्या आहेत. ट्विटर बंद झाल्यावर युजर्सनी सोशल मीडियावर मीम्सही शेअर केले. ‘ट्विटरवर आपले स्वागत आहे!’ असा संदेश पाहिला आणि लिहिले, “ट्विटरला वाटते की मी आज नवीन आहे. कदाचित मी ट्विटरवर पुन्हा जन्म घेतला आहे असे एका वापरकर्त्याने असे लिहिले.

Story img Loader