सोशल माध्यमांवर अनेक विषयांवर लोक कमेंट करतात, मात्र त्यात व्याकरण चुका किंवा काही झाल्यास एडिट हे बटन बरेच उपयोगी पडते. फेसबूकवर ही सुविधा आहे. मात्र, ट्विटरवर ही सुविधा नव्हती. गेल्या आठवड्यात ट्विटरने आपण एडिट बटवर काम करत असल्याचे जाहीर केले होते. याविषयावर आणखी एक माहिती समोर आली आहे. टेकक्रंचच्या अहवालानुसार, ट्विटरवर एडिटचा वापर करता येईल मात्र तो मर्यादित असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केवळ इतक्याच वेळी करता येईल दुरुस्ती

सुरुवातील ट्विटर केवळ काही मोजक्या देशातील ब्ल्यू सब्सक्राइबर्सना आधी एडिट बटन वापरता येणार आहे. एडिट फीचरद्वारे यूजरला ३० मिनिटांच्या आत आपले ट्विट एडिट करता येणार आहे. मात्र या ३० मिनिटांतही यूजरला मर्यादा घालण्यात आली आहे. यूजरला ३० मिनिटांत केवळ ५ वेळाच आपले ट्विट एडिट करता येणार आहे.

(Google Logo Colour: गूगलच्या लोगोचा रंग का बदलला? नेटकऱ्यांचा गोंधळ पाहून सुंदर पिचाईंनी सांगितले कारण)

३० मिनिटांत हे करता येईल

टेकक्रंचच्या अहवालानुसार, ३० मिनिंटात केवळ ५ वेळाच एडिटची सोय मिळणार असल्याची पृष्टी ट्विटरने केली आहे. या कालावधील यूजरला लेखी चुका दुरुस्त करता येईल तसेच टॅग्स एडिट करता येईल आणि मीडिया फाइल्स अपलोड करता येतील.

आधी या देशाला सुविधा मिळेल

अहवालानुसार आधी न्युझिलंड येथील नागरिकांना एडिटची सोय मिळणार आहे. तसेच ट्विटर या नवीन वैशिष्ट्यासह वापरकर्त्याच्या वर्तनाचे निरीक्षण करत आहे. पुढे ठरवलेल्या कालावधीत संपादन मर्यादा बदलायची की नाही यावर विचार चालू आहे.

(Apple Watch : अ‍ॅपल वॉच अल्ट्रा महाग, पण ‘हे’ दमदार फीचर्स एकदा विचार करायला भाग पाडतील)

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter edit button will be able to use only five times says report ssb